शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 11:31 IST

भारतीय सेनादलात असलेल्या भंडारा येथील जवानाचा गुरुवारी (दि. १०) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जीपला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त गुरुवारी उशिरा रात्री भंडाऱ्यात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली.

ठळक मुद्देतीन महिन्यांच्या सुट्टीनंतर तो ५ मार्चला सैन्यदलाच्या कर्तव्यावर गेला हाेता.

भंडारादीर्घ सुटी संपवून आठवड्याभरापुर्वी सैन्यात कर्तव्यावर रुजू झाला. विलगीकरण केंद्रात जाताना जीपला अपघात झाला. त्यात भंडाऱ्याचा सुपूत्र शहीद झाला. ही वार्ता गुरुवारी रात्री कळताच संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले. पत्नीसह आई-वडीलांचे अश्रू थांबायला तयार नाही. शुक्रवारी दिवसभर घरासमोर नातेवाईकांची गर्दी आणि सुपूत्राच्या पार्थिवाची प्रतीक्षा सुरु होती.

संदीप उर्फ चंद्रशेखर रुपचंद भोंडे (३४) रा. न्यू ऑफीसर कॉलनी भंडारा कर्तव्या असे मृत जवानाचे नाव आहे. २००८ मध्ये तो २१ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. देश सेवेसाठी तो जम्मू- कश्मीरमध्ये कर्तव्यावर होता. ७५ दिवसांची सुटी घेवून तो भंडारा येथे आला होता. ५ मार्च रोजी तो सर्व कुटुंबियांचा निरोप घेवून आपल्या कर्तव्यावर रुजू झाला.

नागपूर मार्गे दिल्लीला विमानाने आणि तेथून जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचला. गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यातील गच्छीगण येथून विलगीकरण केंद्राकडे आपल्या सहकाऱ्यासह जीपने जात होता. यावेळी सरकुली येथे अपघात झाला. जीप अनियंत्रीत होवून १२ मीटर खोल दरीत पडली. त्यात चंद्रशेखर यांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले वडील रुपचंद भोंडे यांना फोन आला. अपघातात चंद्रशेखरची मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 

अवघ्या आठ दिवसापूर्वी गेलेल्या सुपूत्राची अशी वार्ता कानी पडली आणि ते एकदम खालीच बसले. चंद्रशेखरची पत्नी किरणला या दुर्देवी घटनेची माहिती कळताच तिच्यावर आकाश कोसळले. चंद्रशेखरच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबायला तयार नाही. भंडाऱ्यात आपल्या शहरातील तरुण शहीद झाल्याचे कळताच प्रत्येकजण हळहळत होते.  नातेवाईकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. चंद्रशेखरच्या मागे पत्नी, पाच वर्षाचा मुलगा पारस, आई-वडील, एक  भाऊ आणि एक बहीन असा परिवार आहे.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

शहीद चंद्रशेखर भोंडे याचे पार्थिव भंडारा येथे आणण्यात येणार असून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मात्र पार्थिव शरीर नेमके कधी येणार याची माहिती शुक्रवारी दुपारपर्यंत कुटुंबियांना नव्हती. त्यामुळे ते जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात होते. चंद्रशेखरचे मुळ गाव मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव आहे. अंत्यसंस्कार डोंगरगाव येथे करायचे की भंडाऱ्यात हे चंद्रशेखरचे पार्थिव आल्यानंतर निश्चित होणार असल्याचे भोंडे कुटुंबियांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातSoldierसैनिकbhandara-acभंडाराDeathमृत्यू