शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

अवजड वाहनाच्या धडकेत सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार

By युवराज गोमास | Updated: July 20, 2023 14:52 IST

राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव डेपो जवळील घटना

भंडारा : महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असतांना अज्ञात अवजड वाहनाच्या धडकेत एक सहा ते सात वर्षीय मादा बिबट जागीच ठार झाले. ही घटना बुधवारला (१९ जुलै) रात्री २ ते ३ वाजताचे दरम्यान (मध्यरात्री) भंडारा ते लाखनी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील गडेगाव डेपो जवळ घडली.

गडेगाव राष्ट्रीय महामार्ग गस्ती पथकांना ही घटना माहित होताच त्यांनी भंडारा वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. उपवनसंरक्षक राहूल गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक, भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यावेळी मृतक बिबट हा महामार्गावर मृत अवस्थेत दिसून आला. घटनेचा मौका पंचनामा करून मृतक बिबटास तातडीने उचलून गडेगाव डेपो येथे हलविण्यात आले. गुरूवार (२० जुलै) रोजी सकाळी १० वाजताचे सुमारास साकोलीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके, किन्हेरीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार व पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरेश निपाने यांच्या चमूने शवविच्छेन केले. गडेगाव डेपो आगार परिसरात दाह संस्कार करण्यात आले.

यावेळी भंडाराचे सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलक, भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे, काेका येथील वनपाल धारणे, जी. आर. नागदेवे, कवलेवाडाचे वनरक्षक नेवारे, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, नदीम खान तसेच वनमजूर व कोका वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

मृतक मादा बिबटाचे वय सहा ते सात वर्ष होते. जोरदार धडक लागल्याने बिबटच्या कमर व डोक्याला गंभीर इजा झाली व जागीच मृत्यू झाला.

- डॉ. गुणवंत भडके, पशुधन विकास अधिकारी साकोली.

अज्ञात वाहनाने गंभीर धडक मादा बिबटचा जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मौका पंचनामा करून गडेगाव डेपो परिसरात दाह संस्कार करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे.

- संजय मेंढे, वनपरिक्षेत्राधिकारी भंडारा.

टॅग्स :Accidentअपघातleopardबिबट्याDeathमृत्यू