घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: March 1, 2024 06:39 PM2024-03-01T18:39:05+5:302024-03-01T18:39:28+5:30

घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने हल्ला केला.

A mother and daughter were attacked with a knife after entering the house Durga Nagar incident in Tumsar city | घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना

घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना

भंडारा: घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने महिलेच्या मानेवर व अल्पवयीन मुलीच्या पायावर प्राणघातक हल्ला केला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी दुपारी १.३० वाजता दरम्यान तुमसर शहरातील दुर्गा नगरात घडली. विश्वास चंद्रिकापुरे (२५, कुंभारे नगर, तुमसर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजता दरम्यान ४५ वर्षीय आई आणि मुलगी आपल्या घरी बसल्या असताना विश्वासने त्यांच्या घरी प्रवेश करून धारदार शस्त्राने आईच्या मानेवर व अल्पवयीन मुलींच्या पायावर चाकूने हल्ला केला. दरम्यान घाबरून आई व मुलीने घराबाहेर पळ काढत आरडाओरड केली. लगतच्या घरी जाऊन आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या आईवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर अल्पवयीन मुलीला सुट्टी देण्यात आली आहे. प्राणघातक हल्लेखोर विश्वास हल्ला करुन घटनास्थळावरुन पसार झाला.तो महिलेच्या घरी दुचाकीने आला होता, अशी माहिती आहे. दुचाकीने स्वत:च्या घरी गेल्यावर तो एका चार चाकी वाहनाने पसार झाल्याची माहिती पुढे आहे. वृत्त लिहीतपर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. सदर हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असल्याची चर्चा आहे. आरोपीचा शोध घेण्याकरीता तुमसर पोलीस रवाना झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव याननी भेट दिली. पोलिस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजय पंचबुध्दे, जयसिंग लिल्हारे तपास करीत आहेत.

Web Title: A mother and daughter were attacked with a knife after entering the house Durga Nagar incident in Tumsar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.