फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 22:11 IST2022-11-24T22:10:54+5:302022-11-24T22:11:24+5:30
Bhandara News अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करीत तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला भंडारा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
भंडारा : अल्पवयीन मुलीसोबत मैत्री करीत तिच्यावर अत्याचार करून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला भंडारा पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी अटक केली. दीड महिन्यात अल्पवयीन मुलीला ठिकठिकाणी बोलावून अत्याचार केला. राजिक मतीन शेख (२६) रा. सौदागर मोहल्ला, भंडारा असे आरोपीचे नाव आहे.
भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकात राजिकचे अत्तरचे दुकान आहे. दीड महिन्यापूर्वी पीडित १७ वर्षीय मुलगी राजिकच्या दुकानात अत्तर घ्यायला गेली होती. मात्र, त्यावेळी मुलीला हवे असलेले अत्तर मिळाले नाही. यावेळी राजिकने मुलीचा मोबाईल नंबर घेऊन तिच्याशी व्हॉट्सॲपवर चॅटिंग सुरू केली. यातून दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर आरोपीने तिला शहरालगत असलेल्या कोका अभयारण्यालगत असलेल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी तिचे काही अश्लील फोटो काढले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत राजिकने अनेकवेळा अत्याचार केला. हा सर्व प्रकार दीड महिन्यापासून सुरू असल्याने अखेर पीडिताने भंडारा शहर गाठत पोलिसात दाखल तक्रार दाखल केली. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आरोपी राजीक खान याच्याविरुद्ध कलम ३५४ (ड), ३७६, ४, ८ व पाॅक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.