जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2023 16:31 IST2023-05-09T16:31:05+5:302023-05-09T16:31:26+5:30
Bhandara News जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे.

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे. भूषण रामलाल आंबेकर (२२, रोहा, ता. मोहाडी) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पीडित मुलीच्या ओळखीचा फायदा घेऊन त्याने तिच्याशी सलगी वाढविली. त्यानंतर तिच्या घरी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र पीडितेने हिंमत दाखवित आई, वडील व चुलत भावाला हा प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी तुमसर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी भूषण विरुध्द गुन्हा दाखल करून त्याला पोक्सो कायद्याखाली अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमर धंदर, पोलिस उपनिरीक्षक खंडाईत करीत आहेत.