शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नव्या संचमान्यतेचा धसका; शिक्षकांनी सुरू केली विद्यार्थ्यांची शोधमोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:10 IST

शिक्षकांचे वाढले 'टेन्शन' : मात्र, इंग्रजी शाळांकडे वाढला विद्यार्थ्यांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या ५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी संचमान्यतेचे नवीन निकष लागू करण्यात आले आहेत. हे निकष सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार आहेत. त्यामुळे बहुतांश शाळांमध्येशिक्षकांची संख्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाने शिक्षकांचे टेन्शन वाढल्याचे दिसून येत आहे. संच टिकविण्यासाठी शिक्षकांची गावागावांत भटकंती सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अलीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढला आहे. अशातच मराठी शाळांसाठी शासनाच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामधील बऱ्याच अटी शर्ती असून, त्या जाचक ठरत आहेत. या निकषांचा विचार केल्यास वर्ष २०२४-२५ पासून शिक्षक संख्या मान्यतेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ते प्रमाण टिकवणेदेखील अवघड असणार आहे. संचमान्यतेच्या निकषानुसार पटसंख्या वाढविण्यावर शिक्षकांकडून अधिक भर दिला जात आहे. जिल्हा परिषद शाळासह अन्य अनुदानीत शाळांतही पटसंख्या रोडावली आहे.

संचमान्यतेचे नवे निकष याप्रमाणेशासनाच्या संचमान्यतेची संदर्भ तारीख ३० सप्टेंबरपर्यंतची असणार आहे. द्विशिक्षकी शाळांमध्ये ६० पटासाठी किमान दोन शिक्षक असणार आहेत. मात्र, तिसरा शिक्षक पात्र होण्यासाठी किमान १६ मुलांची अधिकची आवश्यकता असणार आहे. 

तीन शिक्षक टिकविण्यासाठी किमान ७६ पटसंख्या असणे आवश्यक आहे. २० पटसंख्येच्या शाळेमध्ये दोन शिक्षक असणार. तथापि, एक नियमित शिक्षक आणि दुसरा सेवानिवृत्त शिक्षक, अशी दोन पदे असणार आहेत.

पटसंख्या दहापर्यंत किवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त एक शिक्षक मान्य होणार आणि तोही सेवानिवृत्त शिक्षकांमधून नेमला जाणार आहे. 

इयत्ता सहावी ते आठवीमध्ये एकच वर्ग असल्यास ३५ पर्यंत एक शिक्षक आणि त्यापुढे ५३ पटानंतर दुसरा शिक्षक मान्य होणार आहे. तर तिसऱ्या शिक्षकासाठी किमान ८८ पटसंख्या लागणार आहे.

आठवीपर्यंत १५० विद्यार्थी पटसंख्या हवीइयत्ता सहावी ते आठवीमध्ये दोन वर्ग असल्यास ७० पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक आणि त्यापुढे ८८ पटसंख्येनंतर तिसरा शिक्षक मान्य होणार आहे. त्यानंतर शिक्षक मान्य करण्यासाठी प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांमागे शिक्षक मिळणार आहे. इयत्ता सहावी ते आठवीसाठी नवीन शिक्षक पात्र होण्यास किमान संख्येपेक्षा १८ विद्यार्थ्यांची पटसंख्या असणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक पद पात्र होण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी, आठवीची पटसंख्या किमान १५० असावी लागणार आहे.

नव्या संचमान्यतेच्या निकषाची पूर्तता नवीन शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय कामकाज सुरू आहेत. पटसंख्येचे पाळले जातील.- वर्षा बेले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. भंडारा

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक