शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

९६७ डेरेदार वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 00:22 IST

वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर दुसरीकडे कत्तल झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कोणतेही नियोजन दिसत नाही.

ठळक मुद्देराज्यमार्गाचे रूंदीकरण : तुमसर ते देव्हाडी रस्त्यावरील १०० वर्ष जुने वृक्ष

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शासन ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवित असतानाच राज्यमार्गाच्या रूंदीकरणासाठी एक दोन नव्हे तब्बल ९६७ वृक्षांची कत्तल करण्यात आली. तुमसर ते देव्हाडी राज्यमार्गावर सुरू असून १०० वर्ष जुने वृक्ष तोडले जात आहे. मात्र याबद्दल पर्यावरणप्रेमी शब्दही बोलायला तयार नाही. तर दुसरीकडे कत्तल झालेल्या वृक्षांच्या ठिकाणी वृक्षारोपणाचे कोणतेही नियोजन दिसत नाही.तुमसर ते देव्हाडी रस्त्याच्या चौपदरीकरणाला परवानगी मिळाली. सदर रस्ता डांबरीकरणाचा आहे. रस्ता बांधकाला तुमसर येथून सुरूवात होत आहे. हा रस्ता ब्रिटीशकालीन असून या रस्त्यावर डेरेदार वृक्ष ८० ते १०० वर्षापासून डौलाने उभे आहेत. उन्हाळ्यात सावली देत हे वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करीत आहे. मात्र आता रस्ता चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडणे सुरू झाले आहे. विकास कामांचा पहिला बळी वृक्ष जात आहे. वृक्षांच्या बचावाकरीता कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. डेरेदार वृक्ष मशीनच्या सहायाने तोडले जात आहे.कत्तल केल्याजाणाऱ्या झाडांची किंमत ठरविण्याबाबत संबंधित विभागाने वनविभागाकडे विचारणा केली. वनविभागाने मोजमाप करून ९६७ झाडांची किंमत पाच लाख २६ हजार ६७० रूपये ठरविली आहे. ही रक्कम शासन जमा करण्यात आल्याची माहिती आहे. मुळ किंमत बाजारभावाने देण्यात आली. परंतु तेवढे मोठे झाड तयार होण्यासाठी १५ ते २० वर्ष लागणार त्याचा येथे हिशेब करण्यात आला नाही.वृक्षारोपणाला खोकरारनाम्यानुसार तोडलेल्या वृक्षांच्या दुप्पट वृक्ष लावण्याची तरतुद आहे. परंतु झाडे लावल्यानंतर ती जगवणार कोण, यासंबंधीत करारनाम्यात कोणताही उल्लेख नाही. केवळ कागदोपत्री झाडे लावून हा रस्ता उजाड केला जात आहे. तर तुमसर-देव्हाडी रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित बांधकाम कंपनीने दिली.तुमसर-देव्हाडी रस्ता बांधकामात ९६७ वृक्ष तोडले जाणार आहेत. स्थानिक वनविभागाने वृक्षांचे मूल्यमापन करून किंमत ठरविली. वरिष्ठस्तरावरूनच वृक्ष कापण्याची परवानगी मिळाली आहे. रस्ता बांधकामानंतर दुप्पट झाडे लावण्यात येणार आहे.-गोविंद लुथे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.

टॅग्स :environmentपर्यावरण