शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूर अन्नपुरवठा विभागाच्या गोडावूनमधील ९ हजार क्विंटल तांदळाला बुरशी; जबाबदार कोण? कुणावर होणार कारवाई ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 20:18 IST

Bhandara : सीएमआरअंतर्गत अन्नपुरवठा विभागाच्या भाड्याने असलेल्या गोदामातीत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतो; मात्र देखरेख न केल्याने लाखांदूर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोडावूनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाला बुरशी लागली.

रवींद्र चन्नेकर लोकमत न्यूज नेटवर्कबारव्हा : सीएमआरअंतर्गत अन्नपुरवठा विभागाच्या भाड्याने असलेल्या गोदामातीत तांदूळ बाहेर जिल्ह्यात पाठविण्यात येतो; मात्र देखरेख न केल्याने लाखांदूर तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोडावूनमधील अंदाजे नऊ हजार क्विंटल तांदळाला बुरशी लागली. त्यामुळे या तांदळाचे पीठ झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

तहसील कार्यालय अन्नपुरवठा विभागामार्फत सीएमआरअंतर्गत नागपूर जिल्ह्याला अंत्योदय व बीपीएल लाभार्थ्यांना तांदूळ पुरवठा केला जातो. मागील सहा महिन्यांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विभागाने भाडेतत्त्वावर गोदाम घेऊन तांदूळ साठविले होते. अंदाजे नऊ हजार क्विंटल धान्याचा हा साठा होता. त्याची नासाडी झाल्याचे चित्र दिसून आले.

या गोदामातील तांदळाची उचल न झाल्यामुळे त्या तांदळाला बुरशी धरली असून पीठ निर्माण झाले आहे. त्या गोदामाची स्थिती तांदूळ साठविण्यायोग्य नसतानाही त्या ठिकाणी साठवणूक करण्यात आली. पावसाळ्यात गोदामाला गळती झाल्याने तांदूळ खराब झाला. तांदूळ बाहेरजिल्ह्यांना पाठवायचा होता; मात्र त्याची गुणवत्ताच खराब झाल्याचे दिसून आल्याने हा तांदूळ स्वीकारला नसल्याची माहिती आहे. 

गोरगरिबांना दर्जेदार तांदूळ देण्यात यावा, यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतो. मात्र अन्नपुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने नऊ हजार क्विंटल तांदळाला पुन्हा चाळणी लावण्याची व पॉलिश करण्याची वेळ आली आहे. त्याची भरपाई अन्नपुरवठा विभाग करून देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तालुक्यात विविध ठिकाणी शासकीय गोदामांचे बांधकाम केले असून अनेक दिवसांपासून ती गोदामे रिकामी आहेत; तर काहींचे काम चालू आहे. मात्र जो तांदूळ गोरगरिबांना वाटण्यात येतो, तो साठवून ठेवण्यास योग्य नसलेल्या गोदामात ठेवण्यात आला.

गोदामाची दुर्दशा तरीही केली साठवणूक

हा खराब झालेला तांदूळ चाळणी व पॉलिश करण्यासाठी ट्रकद्वारे राइस मिलमध्ये पाठविणे सुरू झाले आहे. विशेष म्हणजे अन्नपुरवठा विभागाच्या गोदामाची दुर्दशा झाली असताना, त्या ठिकाणी तांदूळ कसा काय साठविण्यात आला, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

"गोदामाला पावसाळ्यात गळती लागल्याने तांदूळ पाण्यात भिजला. त्यामुळे तो खराब झाला. त्याची उचल न झाल्यामुळे तो परत करण्यात आला. आता खराब झालेल्या तांदळाला चाळणी, पॉलिश करून पुन्हा तो नागपूर जिल्ह्याला पाठवण्यात येईल. यानंतर नवीन शासकीय गोदामात तांदळाची साठवणूक केली जाईल."- धीरज मेश्राम, अन्नपुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय, लाखांदूर.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Lakhani Food Department's Rice Stock Spoiled; Who is Responsible?

Web Summary : 9,000 quintals of rice in Lakhani's food supply warehouse spoiled due to mold. Negligence and leaky storage caused the damage. An investigation is underway to determine responsibility and prevent recurrence.
टॅग्स :government schemeसरकारी योजनाCropपीक