टंचाईग्रस्त १५४ गावांसाठी ८.९ कोटींची मदत वितरित

By Admin | Updated: January 17, 2015 01:08 IST2015-01-17T01:08:24+5:302015-01-17T01:08:24+5:30

खरीप हंगामातील १५४ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. त्या गावांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे.

8.9 crores distributed assistance for 154 villages with scarcity | टंचाईग्रस्त १५४ गावांसाठी ८.९ कोटींची मदत वितरित

टंचाईग्रस्त १५४ गावांसाठी ८.९ कोटींची मदत वितरित

भंडारा : खरीप हंगामातील १५४ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी आहे. त्या गावांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात ८.९ कोटी रुपयांचा निधी तहसिलदारांना वितरीत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील १५४ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव हे एकमेव गाव आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ, विरली (खंदार), चिचबोडी, नवेगाव, चकारा, गोसे (बुज), मेंढा, गोसे (खुर्द), वासेळा, कोरंभी, ठाणा, मुजबी, कन्हाळगाव, किसनपूर ह., खोकरी (ढोरप), चन्नेवाडा, चांदी, प्रधान (ढोरप), सिरसाळा, मांडवगोटा, निमगाव, नायगाव, कोसमबोडी, वाही, गराडापार, कच्चेखनी, बेटाळा, वेळवा, रोहणा, सिंगोरी, आवडगाव, चिचगाव, आमगाव, सालेभट्टी, कोटलपाार, रनाळा, निष्ठी, वायगाव, ठाणेगाव, मेंढेगाव, खापरी, पांजरेपार, काकेपार, धाकुडी, टेकाडी, भुयार, सेलोरी, गायडोंगरी या गावाचा समावेश आहे.
तुमसर तालुक्यातील रोंघा, रोंघा (हमेशा), लेंडेझरी, आलेसूर, खापाखुर्द, गोंडीटोला, कारली, चिखला, सितासांवगी.
मोहाडी तालुक्यातील बोरी, करडी, मोहगाव (क.), हिवरा, नवेगाव (रिटी), बच्छेरा, फुटाळा, देऊळगाव, बिटेखारी, टांगा, भिकारखेडा, डोंगरगाव, महालगाव, देव्हाडा (बुज), नरसिंगटोला, जांभळपाणी, उसरीपार, दवडीपार, नवेगाव, किसनपूर, पांजरा, खडकी, पालोरा, केसलवाडा.
लाखांदूर तालुक्यातील बेलाटी, पाचगाव, पालेपेंढरी, पाऊलदवना, परसोडी, तई (खुर्द), सोनेगाव, घोडेझरी, पेंढरी, तिरखुरी, हरदोली, तई (बुज), बोथली, दिघोरी (मोठी), साखरा, तावशी, चिकना, चिचाळ, कोदामेळी, मानेगाव, बोरगाव, दहेगाव, पिपरवाही (रिटी), बारव्हा, जैतपूर, धर्मापुरी, खोलमारा, पारडी, खैरी, कोदामेळी, मुरमाडी, मुर्झा, झरी, मालदा.
लाखनी तालुक्यातील कोलारी, भूगाव, मेंढा, सोनमाळा, डोंगरगाव, किटाडी, देवरी, सायगाव, सानगाव, गोंदी, राजोली रिठी, ढिवरखेडा, इसापूर, मांगली, बांद्राझरी रिठी, मचारणा, निमगाव, जेवनाळा, गोंडेगाव, पालांदूर, कवलेवाडा, कवडसी, खैरी, पहाडी, मेंगापूर, मुरमाडी हमेशा, मुरमाडी रिठी, वाकल, मऱ्हेगाव, पाथरी, खराशी, खुनारी, लोहारा, नरव्हा, घोडेझरी, रेंगोळा, केसलवाडा, गुरढा या गावांचा समावेश आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 8.9 crores distributed assistance for 154 villages with scarcity