आठ कोटींचे धानाचे चुकारे अडले
By Admin | Updated: August 23, 2014 23:47 IST2014-08-23T23:47:45+5:302014-08-23T23:47:45+5:30
तुमसर तालुक्यातील तुमसर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री केंद्रांतर्गत आठ केंद्रातील शेकडो शेतकऱ्यांचे आठ कोटींचे धानाचे चुकारे अडले आहेत. सिहोरा राईस मिल व जिल्हा कृषी औद्योगिक

आठ कोटींचे धानाचे चुकारे अडले
शेतकऱ्यांत असंतोष : शासनाने निधी पोहोचलाच नाही
ंतुमसर : तुमसर तालुक्यातील तुमसर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री केंद्रांतर्गत आठ केंद्रातील शेकडो शेतकऱ्यांचे आठ कोटींचे धानाचे चुकारे अडले आहेत. सिहोरा राईस मिल व जिल्हा कृषी औद्योगिक संघाअंतर्गत केंद्राचेही धानाचे चुकारे अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. राज्य शासनाने येथे निधी उपलब्ध करून दिला नाही.
रब्बी हंगामात २८ हजार क्विंटल तर खरीपात ८६ हजार क्विंटल धानाची खरेदी या केंद्रातून करण्यात आली होती.
तुमसर, हरदोली, बाम्हणी, चुल्हाड, मिटेवानी, चिचोली, डोंगरी बु. व नाकाडोंगरी या केंद्राचा त्यात समावेश आहे. चुल्हाड केंद्रांतर्गत सुमारे ३०० शेतकरी आहेत. सिहोरा येथील सिहोरा राईस मिल तथा जिल्हा कृषी औद्योगिक संघांतर्गत केंनद्राचे सुमारे ३ ते ४ कोटींचे चुकारे अडले आहेत.
जयपाल ईखार यांचे एक लक्ष ६५ हजार तर गोविंदा रहांगडाले यांचे ५० हजारांचे चुकारे आहेत. मे महिन्यात धानाची खरेदी या केंद्रानी केली होती. तीन महिन्यापासून येथे चुकाऱ्याची प्रतीक्षा आहे.
धान कुणाला?
राईस मिल मालक जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा यांचे आदेश घेऊन या केंद्रात येतात. धान खरेदी करून त्यांची तांदूळ भरडाई केल्यावर पुन्हा ते शासकीय गोदामात पाठविले जाते. एक एजंट म्हणून धान खरेदी केंद्र मागील एप्रिल पासून धानाचे चुकारे प्रलंबित आहेत.
शासनाकडून उशीर
तुमसर तालुक्यातील आठ कोटी व जिल्ह्यातील सुमारे ३५ कोटी रुपये धानाचे चुकारे थकीत आहेत. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. शासनाकडून निधी प्राप्त न झाल्यानेच श्ेतकऱ्यांचे चुकारे अडले आहेत. येत्या तीन ते चार दिवसात धानाचे चुकारे मिळतील असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी रमेश ठोसरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)