चिचाळ येथे कृषी केंद्रात ७० हजारांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:15+5:302021-08-13T04:40:15+5:30

चिचाळ येथील सचिन भारत काटेखाये यांचे चांदणी चाैकात शिवम कृषी केंद्र आहे. बुधवारी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. गुरुवारी ...

70,000 in the agricultural center at Chichal | चिचाळ येथे कृषी केंद्रात ७० हजारांची चाेरी

चिचाळ येथे कृषी केंद्रात ७० हजारांची चाेरी

चिचाळ येथील सचिन भारत काटेखाये यांचे चांदणी चाैकात शिवम कृषी केंद्र आहे. बुधवारी त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. गुरुवारी सकाळी जाऊन पाहतात तर छताचे टिनपत्रे ताेडलेले दिसून आले. चाेरट्याने छत फाेडून दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील काउंटरमध्ये असलेले ७० हजार रुपये लंपास केल्याचे लक्षात आले. या घटनेची तक्रार अड्याळ पाेलीस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. विशेष म्हणजे या दुकानात हमालीचे काम करणारा गुरुवारी नेहमीप्रमाणे कामावर आला नाही, तसेच ताे घरीही आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.

अधिक तपास सहायक पाेलीस निरीक्षक सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक क्रिष्णा साेळुंके करीत आहेत. ग्रामीण भागात सध्या चाेरीच्या घटनांत वाढ झाली असून, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: 70,000 in the agricultural center at Chichal