शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

६८,८२० हेक्टर शेतजमीन पडीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 21:38 IST

जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात अत्यल्प पर्जन्यमान : जिल्हा दुष्काळाच्या सावटात

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे शेतीचा खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षी खरीप हंगामात अद्यापही ६८ हजार ८२० हेक्टर शेतजमीन पडीत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे पºहे करपले, तर, रोवणी केलेल्या शेतीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी चक्रव्यूहात अडकला आहे.जिल्ह्यात दोन लाख ८ हजार ७५० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र खरीप पिकासाठी निर्धारीत करण्यात आले होते. आतापर्यंत केवळ ६०.०३ टक्के हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १८ हजार २७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १७ हजार १३६ हेक्टर क्षेत्रात भात नर्सरीची लागवड करण्यात आली असून त्याची टक्केवारी ९३.७६ एवढी आहे. जुलै महिन्यात एकदा झालेल्या दमदार पावसामुळे शेतकºयांनी ५ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रात आवत्याची लागवड केलेली आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतीवर अस्मानी संकट असून दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अपुºया पावसामुळे रोवणी खोळंबली तर पºह्यांचा कालावधी दोन महिन्यांपर्यंत पोहचला आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय होती त्यांनी काही प्रमाणात रोवणी केली. मात्र आता वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने त्यांनाही धानाला पाणी देणे शक्य होत नाही. सद्यस्थितीला शेतकºयांची अवस्था बिकट आहे. यंदा अनेक तालुक्यात पावसाअभावी शेतकºयांनी रोवणीच केली नसल्याने रासायनिक खत व कीटकनाशकाची मागणीही अत्यल्प प्रमाणात आहे. कुठेही खताचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी पावसाळा संपत असातानाही आलेल्या नाही.पावसाच्या पाण्यावर खरीप हंगामात धानाची शेती केली जाते. धान हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ८२ हजार ७६२ हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. ३० आॅगस्ट २०१७ पर्यंत केवळ १ लाख १९ हजार २६७ हेक्टर क्षेत्रावरच धानाची रोवणी झालेली आहे. अर्धापेक्षा अधिक पावसाळा निघून गेला असून सप्टेंबर महिन्यात प्रचंड उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रोवणी झालेले धानपीक करपायला लागले आहेत.९४ दिवसांत ६७ टक्के पाऊसभंडारा जिल्ह्यात सरासरी १३३०.२ मिमी पाऊस पडतो. गतवर्षी २०१६ मध्ये २ सप्टेंबरपर्यंत ७१२ मिमीच्या सरासरीने पाऊस झाला होता. यंदा २ सप्टेंबरपर्यंत ७१७ मिमी पाऊस झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यंदा मात्र पाऊस गतवर्षीपेक्षा ५ मिमीने अधिक असतानाही प्रशासन पावसाची आकडेवारी फुगवून दाखवित असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी एवढाच पाऊस पडला तर तलाव, बोडी कोरडीच कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने पावसाची आकडेवारी कोठून जमा केली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.दुष्काळग्रस्त घोषित करायंदा अत्यल्प पाऊस झाला. ज्या शेतकºयांनी रोवणी केली, त्यांचे रोवणीही करपून गेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा विविध पक्ष, संघटनांनी दिला आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आलेला आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस बरसला नाही. आॅगस्ट महिन्यात रोवणी केली तरीही शेतकºयांना हवे तसे उत्पन्न येण्याची शक्यता नाही.- प्रेमसागर गणविर,जिल्हाध्यक्ष, काँग्रेस,भंडारा