शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

६३ लाखांचे चुकारे थकीत

By admin | Updated: January 7, 2016 00:58 IST

करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली.

खरेदी बंद : करडी धान खरेदी केंद्रावरील प्रकारयुवराज गोमासे करडी (पालोरा) करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली. २ डिसेंबर २०१५ रोजी सुरु झालेल्या केंद्रावर आतापर्यंत ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. केंद्र सुरु होवून एक महिन्याचा कालावधी लोटत असताना अजूनपर्यंत ६६ लाख, १० हजार ९४८.५० रुपयांचे चुकारे मिळालेले नाहीत. थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकरी केंद्राच्या चकरा काढीत असून गोडावून पूर्ण भरल्याने सध्या खरेदी बंद आहे. करडी येथील ग्रामपंचायतच्या कृषी गोडावून मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सदर केंद्र करडी येथील जयकिसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला धान खरेदीसाठी देण्यात आले. या संस्थेमार्फत परिसरातील धानाची खरेदी शासकीय आधारभूत दरात केली जात आहे. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन दिवाळी अगोदर करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष खरेदी २ डिसेंबरपासून करण्यात आली. २ डिसेंबर ते २ जानेवारी १०१६ पर्यंत केंद्रावर ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी प्रती क्विंटल १४१० या शासकीय दरात करण्यत आली. एकुण ६६ लक्ष १०हजार ९४८ रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अद्याप चुकारे शेतकऱ्ळांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आज उद्या चुकारे दिले जातील, असे सांगितले जात असल्याने शेतकरी बंद केंद्राच्या चकरा मारीत आहेत. परंतु केंद्रावर कोणीही मिळत नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे.करडी केंद्राचे गोडावून भरल्याचे कारण देत केंद्र बंद करण्यात आले. केंद्रावर शेतकरी वर्गाने आणलेल्या धान्य परत न्यावा लागला. त्याचा अतिरिक्त खर्च (वाहतूक, हमाली आदी) शेतकऱ्यांच्या माथी बसला. गोडावून मधील धान्याची उचल झाल्यानंतर केंद्र सुरु होतील, असे सांगितले जात आहेत. मात्र केव्हा मालाची उचल होणार? केव्हा केंद्र सुरु होणार? केव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे चुकारे मिळणार? आदी प्रश्नांची माहिती कोणीही देण्यास तयार नाहीत. चकरा मारून थकलेला शेतकरी केंद्रावर धानाची विक्री करून फसल्याची भावना व्यक्त करीत आहे. राज्य शासनाने केंद्र सुरु करताना वेळेवर व खरेदीच्या ८ दिवसात शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, असे आश्वास दिले होते. ते आश्वासन फोल ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा उद्घाटन प्रसंगी दिलेल्या शब्दांना आता अर्थ उरला नसल्यांचे, दिशाभूल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत. करडी येथील धान खरेदी केंद्र परिपूर्ण भरलेला आहे. त्यामुळे खरेदी बंद आहे. गोडावून रिकामे झाल्यानंतर केंद्र पुन्हा सुरु केले जातील. चुकाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. चुकाऱ्यांचे वाटप प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर केले जाईल. खरेदी बंद करण्यात आली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष शरद तितीरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.