६९ शाळांचे भवितव्य ‘अधांतरी’

By Admin | Updated: March 4, 2016 00:25 IST2016-03-04T00:25:26+5:302016-03-04T00:25:26+5:30

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. याची प्रचिती आता भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आली आहे.

6 9 Future of Schools 'Half' | ६९ शाळांचे भवितव्य ‘अधांतरी’

६९ शाळांचे भवितव्य ‘अधांतरी’

कमी पटसंख्येचा बसणार फटका : शिक्षण विभागाचा शासनाकडे अहवाल सादर, शिक्षक-विद्यार्थ्यांचे होणार समायोजन
प्रशांत देसाई  भंडारा
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहेत. याची प्रचिती आता भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाला आली आहे. याबाबत शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे तसा अहवाल सादर केला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात जिल्ह्यातील ६९ शाळांमधील पटसंख्या २० पेक्षा कमी राहिल्यास त्या बंद होण्याची स्थिती उद्भवू शकते.
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक निश्चितीचे नवे निकष असलेला आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे. यानुसार, राज्यातील शाळांची अद्यावत माहिती शिक्षण विभागाने मागितली. पुढील वर्षीच्या नविन शैक्षणिक सत्रात शाळांच्या विद्यार्थी पटसंख्येची माहिती घेण्यात आली. यात भंडारा जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेला अहवालातून धक्कादायक बाब समोर आली. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेला इयत्ता पाचवीचा वर्ग जोडणे व सातवीपर्यंतच्या शाळेला आठवीचा वर्ग जोडण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमाच्या शाळा त्यात विशेषत: जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या शाळांमधील गुणवत्ता कमी असल्यामुळे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावली आहे.
इयत्ता पहिली ते चवथीपर्यंच्या शाळांना पाचवीचा वर्ग जोडल्यानंतरही जर पटसंख्या २० पेक्षा कमी राहिल्यास अशा शाळांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे पटसंख्या कमी असल्याने शिक्षकांना महिन्याचा पगार देणे शिक्षण विभागाला परवडण्याजोगा नाही. त्यामुळे अशा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना जवळच्या दुसऱ्या शाळेत समायोजित करण्यात येणार आहे.
त्यादृष्टिने राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने आताच तशी पाऊले उचलली आहे. नुकतीच राज्य शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून त्यांच्या जिल्ह्यातील माहिती मागविली. यात जर अशी परिस्थिती उद्भवल्यास अनूदानित, विनाअनुदानित, जिल्हा परिषद, नगर पालिका, खासगी, मदरसा अशा ६९ शाळांमध्ये यावर्षी २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या आहेत. त्यातुळे पुढील शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे या शाळांवर कदाचित गडांतर येवू शकते. या शाळेत शिकणाऱ्या ८७६ विद्यार्थ्यांना अन्य शाळेत समायोजित करण्यात येणार आहे.

Web Title: 6 9 Future of Schools 'Half'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.