५७०२ होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST2019-10-03T06:00:00+5:302019-10-03T06:00:47+5:30

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स २४, ४८ व ७२ तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

5702 Hoarding banners, posters deleted | ५७०२ होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

५७०२ होर्डिंग बॅनर, पोस्टर्स हटविले

ठळक मुद्देतीनही मतदारसंघाचा समावेश : आदर्श आचारसंहिता सुरु होताच जिल्हा प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत तीनही क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी ठिकाणावर लावण्यात आलेली ५ हजार ७०२ होर्डिंग, बॅनर, पाम्लेट, पोस्टर्स हटविली आहेत. तर ३ लाख ६० हजार ९९० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आली आहे. १६४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून १८२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये याकरीता तीनही मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर खबरदारी घेतल्या जात आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची घोषणा होताच आदर्श आचार संहिता सुरु झालेली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद व नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक, खाजगी व शासकीय कार्यालय परिसरात तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स २४, ४८ व ७२ तासाच्या आत हटविण्याची कार्यवाही निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. तुमसर क्षेत्रातील सर्वाधिक २८११, साकोली १०५४ तर भंडारा १८३७ असे ५७०२ होर्डिग, बॅनर व पोस्टर्स हटविण्यात आले. तर ६ लाख ६० हजार ९९० रुपयांचे मद्य जप्त करण्यात आले आहे. १७४ शस्त्रास्त्रे जमा करण्यात आले असून १८२ जणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होऊ नये या करीता तीनही क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर पथक तैनात करण्यात आले आहे.
आचार संहितेचे उल्लंघन होईल अशा स्वरुपाचे शासकीय सार्वजनिक, खाजगी ठिकाणी होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स लावण्यावर मनाई करण्यात आली आहे.

फलक दिसणार नाहीत याची खबरदारी घ्या
शासकीय परिसरात लावण्यात आलेले २४ तास, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले ४८ तास, तर खाजगी ठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स ७२ तासात हटविण्यात यावे, असे सख्त निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. या निर्देशान्वये जिल्ह्यातील तुमसर, भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदेर्शानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. हटविण्यात आलेले जागेवरील फलक पुर्ववत लावण्यात येणार नाही याबाबत स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
 

Web Title: 5702 Hoarding banners, posters deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.