भूसंपादनासाठी ४.८९ कोटी मंजूर

By Admin | Updated: February 12, 2016 01:24 IST2016-02-12T01:24:29+5:302016-02-12T01:24:29+5:30

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना शासनाने ४.८९ कोटी रूपये भूसंपादनकरिता मंजूर करण्यात आले.

4.89 crore approved for land acquisition | भूसंपादनासाठी ४.८९ कोटी मंजूर

भूसंपादनासाठी ४.८९ कोटी मंजूर

निधीची प्रतिक्षा : ७२ प्रकरणांचा समावेश
तुमसर : बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना शासनाने ४.८९ कोटी रूपये भूसंपादनकरिता मंजूर करण्यात आले. तुमसर उपविभागीय कार्यालयाने ७२ प्रकरणे मंजुर केली. सरळ शेती खरेदी प्रकरणे १२ आहेत. सन २०१७ पर्यंत हा प्रकल्प मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
तुमसर तालुक्यात सितेकसा येथे बावनथडी प्रकल्पासाठी शेतजमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला नाही. राज्य शासनाने या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी १२० कोटी मंजूर केले. भूसंपादनाकरिता ४.८९ कोटींचा मोबदला मंजूर करण्यात आला. तुमसर तालुक्यातील अनेक प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा मोबदला मिळाला नाही. भूसंपादन करणे, नव्याने कारवाई करणे व सरळ खरेदी करणे या तत्वानुसार येथे शेतीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे.
बावनथडी प्रकल्पाची सुरूवात सन १९७७ मध्ये झाली होती. अनेक अडथडे पार करून हा प्रकल्प मार्गी लागला. राज्य शासनाने केवळ १२० कोटी या प्रकल्पाच्या उर्वरित कामांकरिता मंजूर केले, परंतु एवढ्या तुटपूंज्या निधीत प्रकल्प पुर्णत्वास येण्याची शक्यता दिसत नाही.
प्रकल्पाच्या अनेक लहान मोठ्या वितरीकेची कामे अपूर्ण आहेत. वितरिकेची कामे केव्हा होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. राज्य शासनाने सन २०१७ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वाची हमी दिली आहे. परंतु प्रकल्प कार्यालयात सामसूम दिसत असून केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 4.89 crore approved for land acquisition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.