जलयुक्त शिवाराची ४५८ कामे अर्धवट

By Admin | Updated: May 8, 2017 00:20 IST2017-05-08T00:20:52+5:302017-05-08T00:20:52+5:30

राज्य शासनासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १०१० कामांपैकी ४५८ कामे अजुनही पूर्ण व्हायची आहे.

458 works of Jalak Shivaraya partially | जलयुक्त शिवाराची ४५८ कामे अर्धवट

जलयुक्त शिवाराची ४५८ कामे अर्धवट

५५२ कामे पूर्ण : आतापर्यंत ५.५१ कोटींचा खर्च
इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनासाठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या जलशिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण १०१० कामांपैकी ४५८ कामे अजुनही पूर्ण व्हायची आहे. विशेष म्हणये बूर्ण झालेल्या ५५२ कामांसाठी प कोटी ५१ लक्ष २६ हजारांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सदर अर्धवट कामे सुरू असून मान्सुनच्या आगमनापूर्वी पुर्ण करण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.
पावसाचे पाणी गाव शिवारात अडवून भुगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे हा मुख्य उद्देश्य नजरेसमोर ठेवून सिंचन क्षमता वाढविण्यावर भर देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. प्रत्येक गावातील शंभर टक्के कामे पूर्ण करुन येत्या पावसाळयात प्रत्येक गावात जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करावा, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. शिवार,मागेल त्याला शेततळे, खोल-सलग-समतल चर, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण, सिंचन विहिर बांधकाम, मजगीचे बांधकाम, पाणी साठवण बंधारा, मजगीचे पुनर्रजीवन, लघु पाटबंधारे विभागांतर्गत मामा तलाव दुरुस्ती या योजनेंतर्गत कामे सुरू आहेत. सन २०१६-१७ अंतर्गत एकूण ५९ गावांची निवड करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची २२६ कामे प्रगतिपथावर आहेत.

या विभागांचाही सहभाग
जलयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये कृषी विभागासह अन्य विभागांचाही सहभाग घेण्यात येत आहे. यात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग, लघुसिंचन (जलसंधारण) गोंदिया, उपवनसंरक्षक वनविभाग भंडारा, सामाजिक वनीकरण भंडारा, जिल्हा परिषदेमार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, पेंच व्यवस्थापन, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांचा सहभाग आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागीलवर्षी म्हणजे सन २०१५-१६ मध्ये एक हजार २४ कामे पूर्ण करण्यात आली आहे. या कामासाठी एकूण २८ कोटी ७१ लक्ष रूपये खर्च करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून तालुकानिहाय ८६ गावांची निवड करण्यात आली होती. सर्व यंत्रणा मिळून ही कामे यशस्वीपणे पुर्ण करण्यात आली आहे. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.), गराडा (खु.), सिल्ली, मानेगाव, मकरधोकडा, नवरगाव, ईटगाव, गोलेवाडी, माटोरा, खमारी, पलाडी, मंडनगाव, कवलेवाडा, माडगी, खुर्शीपार या गावाचा समावेश करण्यात आला होता. तसेच तुमसर तालुक्यातील १९, मोहाडी तालुक्यातील १५, पवनी तालुक्यातील १२, साकोली तालुक्यातील ११, लाखनी तालुक्यातील नऊ तर लाखांदूर तालुक्यातील सहा गावांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात आली होती.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या अभियानांतर्गत फायदा मिळवून देण्यासाठी त्या दिशेने जिल्हा कृषी कार्यालयाचे कामे सुरू आहे. सिंचन सुविधा विकसित करण्यावर आमचा भर आहे. जलयुक्त शिवार अभियान शेतकऱ्यांसाठी वरदान असृन जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. यासाठी निधीची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
-डॉ. नलिनी भोयर,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,भंडारा

Web Title: 458 works of Jalak Shivaraya partially

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.