जिल्ह्यात ४५ टक्के रोवणी
By Admin | Updated: August 1, 2014 00:08 IST2014-08-01T00:08:35+5:302014-08-01T00:08:35+5:30
गत १५ दिवसात पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यात अजूनपावेतो ४५ टक्के रोवणी झाल्याची माहिती आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ४० इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा

जिल्ह्यात ४५ टक्के रोवणी
पावसाची प्रतीक्षा : उशिरा रोवणीमुळे उत्पादन घटण्याची शक्यता
ंभंडारा : गत १५ दिवसात पावसाच्या दमदार आगमनामुळे जिल्ह्यात अजूनपावेतो ४५ टक्के रोवणी झाल्याची माहिती आहे. सर्व पिकांची एकुण रोवणीची टक्केवारी ४० इतकी आहे. खरीप हंगामातील हा आकडा पिकाच्या उत्पादनाअंतर्गत अनुकूल नाही असे तज्ज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भंडारा जिल्ह्यात जवळपास पावणेदोन लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. भंडारा जिल्ह्यात धानाची रोवणी ४५ टक्क्याच्या आसपास आटोपली आहे. गत दोन दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रोवणीचे मंदावले आहे. ज्यांच्याकडे पाण्याची किंवा सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे तिथे मात्र रोवणीचे काम जोमात सुरु आहे. कडधान्यामध्ये भूईमुग, तिळ, सोयाबीन व इतर गळीत धान्याची लागवड केली जात आहे. त्याचप्रकारे पाच हजार पेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रामध्ये उसाची लागवड करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातील एकुण १ लक्ष ९८ हजार ६३९ क्षेत्रात धानासह अन्य पिकांची लागवड केली जाते. यापैकी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील दोन्ही कृषी उपविभागांतर्गत ७८ हजार ६१० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाल्याची माहिती आहे. याची एकुण टक्केवारी ३९.५७ इतकी आहे. भंडारा तालुक्यातील एकूण पेरणी क्षेत्र ४३९१ क्षेत्र मोहाडी १२ हजार ४३५ हेक्टर क्षेत्र, तुमसर ७११८ हेक्टर, पवनी २० हजार २६४ हेक्टर, सकोली ८ हजार ४२३ हेक्टर, लाखनी १० हजार ५७१ हेक्टर, लाखांदूर १५ हजार ९९९ क्षेत्र ऐवढे आहे.
पावसाच्या हजेरीवर धान पऱ्हे लागवडीची गती अवलंबून राहणार आहे. बळीराजाला पुन्हा दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या दरम्यान येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा वेधशाळेने वर्तविला आहे.
यंदा उशिरा सुरू झालेल्या रोवणीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ज्या कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी पावसापूर्वी विहीरीच्या पाण्याने रोवणी केली, त्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)