शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

४९९ बालके कुपोषणाच्या विळख्यात

By admin | Updated: November 16, 2014 22:44 IST

महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले

भंडारा तालुक्यात सर्वाधिक प्रमाण : प्रशासन म्हणते 'आॅल ईज वेल'प्रशांत देसाई -भंडारामहिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले तरी प्रशासनाकडून 'आॅल ईज वेल' असल्याचे सांगितल्या जात आहे.एकात्मिक बाल विकास सेवा योजना गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बाल पोषण पद्धतीमध्येच व्यापक बदल होणे गरजेचे आहे.आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ० ते ६ वर्ष वजन घेतलेल्या बालकांची संख्या ८६ हजार ३८३ असल्याची नोंद आहे. यातील तीव्र कमी वजन गटात मोडणारी बालके ४९९ आहे. साधारण श्रेणीत ८२ हजार ५६८ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांचा आकडा ३ हजार ३१६ आहे. यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही भंडारा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्प क्षेत्रामधील अंगणवाडीतील ६ महिने व ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदामाता, तीव्र कमी वजनाची बालके यांना घरपोच आहार पुरविल्या जाते. आहारात गहु, गुळ, सोयाबीन, शेंगदाने आदींचा समावेश आहे. अर्भक व बालकांच्या पोषण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. आहारात विविधता आणणे व उपलब्ध अन्न पदार्थांचा योग्य वापर करणे, सुक्ष्म पोषक तत्वांचा आहार रासायनिक पध्दतीने समुद्धीकरण करणे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक अथवा परिसर स्वच्छता लसीकरण याबाबत जनमानसात जागृकता निर्माण करणे या मुद्यांवर भर देणे गरजेचे आहे.