जांब येथे दारुबंदीसाठी ३४२ महिला सरसावल्या

By Admin | Updated: October 30, 2015 00:45 IST2015-10-30T00:45:47+5:302015-10-30T00:45:47+5:30

मोहाडी तालुक्यातील जांब येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु दुकाने असल्याने गावातील, तरुण, युवक, प्रौढ पुरुष वर्ग दारुच्या आहारी गेले आहेत.

342 women have been arrested for junk alcohol | जांब येथे दारुबंदीसाठी ३४२ महिला सरसावल्या

जांब येथे दारुबंदीसाठी ३४२ महिला सरसावल्या

महिला सरपंचांनी घेतला पुढाकार : महिला ग्रामसभेत दारुबंदीचा घेतला ठराव
जांब (लोहारा) : मोहाडी तालुक्यातील जांब येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु दुकाने असल्याने गावातील, तरुण, युवक, प्रौढ पुरुष वर्ग दारुच्या आहारी गेले आहेत. परिणामी अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत.
जांब येथे मागील ७ वर्षापासून रेंगाळत असलेल्या दारुबंदीचा ठराव वारंवार घेऊन सुद्धा गावातील कोणत्याही व्यक्तीने पुढाकार घेतला नव्हता. गावामध्ये अवैधरित्या दारु विकणारे व देश्ी दारुचे दुकान आहेत. यामध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात तंट्यामध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन प्रथमच महिला सरपंच दीपाली उके यांनी पदभार स्वीकारताच गाव व्यसनमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
मागील काही वर्षापासून दारुबंदी करण्यासाठी २८ आॅक्टोबरला महिलांची आमसभा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नलिनी कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या आमसभेमध्ये सरपंच दिपा उके, उपसरपंच सुधाकर मेश्राम, ग्रामविकास अधिकारी आर.एस. कावळे, ग्रामपंचायतचे सदस्य, सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी व पंचायत समिती सदस्य जगदिश उके व गावातील एकूण ३४२ महिला उपस्थित होते. एका दिवसापूर्वी गावात आॅटो फिरवून दवंडी पिटून दारुबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. महिला सरपंचांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतल्यामुळे या प्रकारची दवंडी पिटण्याची गावातील ही पहिलीच वेळ होती.
आमसभेमध्ये दारुबंदीचा सर्वानुमते ठराव मंजुर करण्यात आला. जांब गावामध्ये चार वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डामध्ये एक समिती स्थापन करण्यात आली. प्रत्येक समितीमध्ये १० महिलांचा समाविष्ट करण्यात आले. गावातील चारही समितीच्या अध्यक्षपदी सरपंच दीपा उके यांची निवड करण्यात आली. गाव विकासाकरिता दारुबंदी करून एक आदर्श गाव बनविण्याची तयारी सरपंचांनी तयारी दशर््विली. सरपंच उके यांनी सात महिन्यात दारुबंदीचा काम हातात घेतल्याने गावातील महिला व पुरुष मंडळींनी त्यांचे कौतुक करीत आहेत. (वार्ताहर)

लोहारातील महिलांनी केली दारुबंदी

तुमसर तालुक्यात येत असलेल्या लोहारा गावातील महिलांनी दारुमुळे माणसाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर दारुबंदीसाठी आंदोलन छेडले. गावातील दारुबंदी करण्यासंदर्भात महिलांची तसेच पुरुषांची ग्रामसभा आयोजित करून गावातील दारु बंदी करण्यासंदर्भात सर्वानुमते ठराव घेण्यात आला. महिलांसह पुरुषांनी सहभाग दर्शवून गाव दारुमुक्त करण्याचा उपक्रम राबविला आहे.
दारुबंदीसाठी गावात महिला व पुरुषांची रॅली काढून दारुपासून होणाऱ्या वाईट परिणामांची गावकऱ्यांना जाणीव करून दिली. या दरम्यान दारुबंदी समिती स्थापन करण्यात आली. तसेच एक विशेष सभेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. सभेमध्ये दारुमुळे उद्भवणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये घरातील कुटुंब प्रमुखांचे रोजगाराकडे, आपल्या कामाकडे, कुटुंबाकडे, शेतीकडे, दारुच्या व्यसनामुळे होणारे दुर्लक्ष तसेच घरातील महिलांना मारहाण करणे, घरातील तरुण, युवा पिढीला दारुचे व्यसन जडणे, गावातील शांतता भंग होवून झगडे, भांडण, तंटे होणे आदी समस्यांचा या सभेमध्ये विचार करण्यात आला व या सर्व समस्यांवर आळा बसविण्यासाठी दारुबंदी केली पाहिजे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच महिला मंडळी आपल्या दारुबंदीच्या कामाला आले.
गावात विकणारे सर्व दुकान बंद करण्यात त्यांना यश आले. रात्री बेरात्री दारु विकणाऱ्यांवर नजर ठेवून दारु विकणाऱ्यांना पकडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. आज परिसरातील लोहारा येथील दारु बंद करण्यात महिलांना यश आले आहे. दारु बंद करण्यात समिती अध्यक्ष फुलन माकडे, उपाध्यक्ष राऊत, सचिव सुनिता ठाकरे, सदस्य गोडबोले, पिपरधारे, सिंगाडे, हुमणे, ठाकरे तसेच दारुबंदीच्या सर्व महिला सदस्यांचा मोठा सहभाग लाभतो.

Web Title: 342 women have been arrested for junk alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.