शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मंजुरीत अडकला ३३६ कोटींचा सुरेवाडा सिंचन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 05:00 IST

वैनगंगा नदीवरील सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या बांधकामासाठी सन २००९ मध्ये थोडीफार कामे झालीत. सन २०१६ मध्ये प्रकल्पाच्या मुख्य अडचणी दूर झाल्या. प्रकल्पासाठी वनविभाग, कोका वन्यजीव अभयारण्य, पर्यावरण मंत्रालय, राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, त्रिसदस्यीय समिती व राज्य नियामक मंडळाने मान्यता प्रदान केली. वनविभागाने पुढचे पाऊल टाकत कालव्यांचे बांधकाम व अन्य कामांसाठी जागेची अडचण दूर करीत वनजमीन उपलब्ध करून दिली. प्रकल्प पूर्णत्वाच्या अडचणी दूर झाल्या आहेत.

युवराज गोमासेलाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : सन २००६ मध्ये सुरेवाडा उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची मूळ किंमत ६८.५८ कोटी रुपये होती. आज १६ वर्षांनंतर प्रकल्पाच्या मूळ किमतीत वाढ होऊन प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा खर्च ३३६.२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. प्रकल्पाच्या सुधारित प्रस्तावास राज्याच्या कॅबिनेटच्या मान्यतेची गरज असताना तीन वर्षांपासून प्रस्ताव मंत्रालयाच्या फाईलीत अडकला आहे.वैनगंगा नदीवरील सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या बांधकामासाठी सन २००९ मध्ये थोडीफार कामे झालीत. सन २०१६ मध्ये प्रकल्पाच्या मुख्य अडचणी दूर झाल्या. प्रकल्पासाठी वनविभाग, कोका वन्यजीव अभयारण्य, पर्यावरण मंत्रालय, राज्य तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, त्रिसदस्यीय समिती व राज्य नियामक मंडळाने मान्यता प्रदान केली. वनविभागाने पुढचे पाऊल टाकत कालव्यांचे बांधकाम व अन्य कामांसाठी जागेची अडचण दूर करीत वनजमीन उपलब्ध करून दिली. प्रकल्प पूर्णत्वाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. भूसंपादनाची कामेही अंतिम टप्प्यात आहेत.ऑक्टोबर २०१९ रोजी गोसेखुर्द उपसा सिंचन विभागाने प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे मान्यतेसाठी पाठविला. तीन वर्षांचा कालावधी लोटत आहे.  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले; परंतु परवानगी मिळालेली नाही. सन २०१९ मध्ये प्रकल्पाला कॅबिनेटची मान्यता मिळाली असती तर आतापर्यंत प्रकल्पाचे बरेच काम पूर्ण झाले असते.  

निधी गेला परत- वर्षभरापूर्वी सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या विविध बांधकामांसाठी सुमारे ३१ कोटींचा निधी राज्याकडून प्राप्त झाला; परंतु प्रकल्पास कॅबिनेट मंत्रिमंडळाची वेळेत मान्यता न मिळाल्याने निधी परत गेला आहे. 

आतापर्यंतची अपूर्ण कामे - आतापर्यंत मिळालेल्या निधीतून वैनगंगा नदीवर पंपहाऊसचे बांधकाम ९५ टक्के झाले. ८ किमी लांब उर्ध्वनलिका बांधकामापैकी ३ किमी लांबीचे बांधकाम पूर्ण झाले, तर ५ किमी लांबीचे बांधकाम अपूर्ण आहे. १६ किमी लांबीचा मुख्य कालवा व १२ लहान वितरिकेचे बांधकाम सुरू झाले नाही.  

सुरेवाडा उपसा सिंचन योजना आमच्या विभागाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने सुधारित प्रस्तावास मान्यता दिल्यास २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करून भंडारा, मोहाडी व तिरोडा तालुक्यांतील २८ गावांतील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा मानस आहे.- अ. वि. फरकटे, कार्यकारी अभियंता, गोसेखुर्द, उपसा सिंचन विभाग आंबाडी

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प