जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST2021-04-25T05:00:00+5:302021-04-25T05:00:36+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत.

जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या आकड्यांकडे कधीच लक्ष जात नाही. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी कोरोनाला हरविले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. नकारात्मक विचार सोडन सकारात्मक विचार केल्यास कोरोनावर मात करता येते. हा कोरोनामुक्त झालेल्यांचा अनुभव आहे. कोरोना झाला तरी घाबरून न जाता योग्य उपचार केले, तर अवघ्या १५ दिवसांत ठणठणीत बरे होता येते.
घाबरु नका, आम्हीही हरविले आहे
क्वारंटाइन काय असते, हे अवघ्या १४ दिवसांत चांगलेच कळले. कोविड केअर सेंटरमध्ये असतानाही हे दिवस कसे संपतील याचीच प्रतीक्षा होती. नकारात्मक येणाऱ्या वार्ता मनावर न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकानेच विचार करायला हवा. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्याही सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे, असेच मला वाटते. औषधांचे सेवन नियमित करावे. मात्र, सामाजिक जाणिवेची जाण कधीही विसरू नये, तरच आपण तग धरू शकतो.
-महेश गणवीर, कोरोनामुक्त
सातत्याने वाढत असलेले आकडे मनाला भेडसावून सोडत होते. मनात भीती येऊ दिली नाही. मन खचले तरी आप्तस्वकीयांशी फोनवर चार वेळा बोललो. आपल्यांचा धीर खूप बळ देऊन गेला. कोविड ब्लाॅकमध्ये घडणाऱ्या घटनांनी आपल्यासोबतही असेच होणार, ही भावना कधीही बाळगू नये. आपल्या डाॅक्टरांवर व उपचारावर विश्वास ठेवा. कोरोनाला हरविणे थोडे कठीण असले तरी अशक्य बाब नाही. सध्या मी स्वस्थ असून आताही सातत्याने काळजी घेत आहे.
-यादोराव तोंडरे, कोरोनामुक्त