२९८ किलो कॉबाईडयुक्त आंबे नष्ट
By Admin | Updated: May 20, 2016 00:45 IST2016-05-20T00:45:58+5:302016-05-20T00:45:58+5:30
आंब्यांना कॉर्बाईडच्या सहायाने कृत्रिमरित्या पिकवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेले २९८ किलो आंबे नष्ट करण्यात आले.

२९८ किलो कॉबाईडयुक्त आंबे नष्ट
कृत्रिमरीत्या पिकविले : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई
भंडारा : आंब्यांना कॉर्बाईडच्या सहायाने कृत्रिमरित्या पिकवून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करून ठेवलेले २९८ किलो आंबे नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनातर्फे सोमवारी साकोलीतील सिव्हील वॉर्ड परिसरात करण्यात आली.
साकोली येथे अब्दुल रहिम फ्रूट अॅण्ड मर्चंटच्या नावे असलेल्या सिव्हील वॉर्डात स्थित गोदामात कृत्रिमरित्या कॉबाईडव्दारे आंबे पिकवित असल्याची माहिती अन्न व औधषी प्रशासनाला मिळाली. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी.नंदनवार यांनी या गोदामाची तपासणी केली. यात आंब्याचे नमुणे घेऊन तपासणी करण्यात आली. यात २९८ किलो आंबे कॉबाईडने पिकविल्याचे दिसुन आल्याने अन्न सुरक्षा मानद कायद्याचे कले ३८(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली. सदर आंबे वाहनाद्वारे साकोली - भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील हद्दीत असलेल्या डम्पिंग यॉर्ड मध्ये नेऊन अधिकाऱ्यांसमक्ष नष्ट करण्यात आले. ही कारवाई अन्न प्रशासन विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांच्या निर्देशानुसार व सहाआयुक्त एम.सी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बी.जी. नंदनवार यांनी केली. यावेळी सहायक बारसागडे, वाहनचालक केंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)