शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

धानक्षेत्रात यंदा 27 हजार हेक्टर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 5:00 AM

भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो.

ठळक मुद्देधानाशिवाय पर्याय नाही : दोन लाख १४ हजार हेक्टरवर होणार रोवणी

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नैसर्गिक संकटाचा कितीही सामना करावा लागला तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे धानपिकाशिवाय पर्याय नाही. विविध पिकांचे प्रयोग केल्यानंतरही शेतकरी काहीही झाले तरी धानाचीच निवड करीत असल्याचे दिसते. यंदा तर धानाच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा २७ हजार हेक्टरने वाढ होणार आहे. गतवर्षी एक लाख ८७ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. यावर्षी दोन लाख १४ हजार हेक्टरवर धान लागवडीचे नियोजन आहे.भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे कोठार म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. नामवंत जातीचा तांदूळ येथे प्रसिद्ध आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र तीन लाख ४२ हजार ३०० हेक्टर असून, लागवडीलायक क्षेत्र दोन लाख सात हजार हेक्टर आहे. एक लाख ९१ हजार ६६४ हेक्टरवर गतवर्षी सर्व पिकांची लागवड झाली होती. जिल्ह्यात सरासरी १३३० मिमी पाऊस होतो. भातपिकाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर असून, यावर्षी यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे. धानपिकातून गत काही वर्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरत नाही. धान लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध समस्या आणि नैसर्गिक प्रकोपाचा सामना करावा लागतो. विक्रीसाठीही शेतकऱ्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. पणन महासंघ धानाची खरेदी करीत असले तरी वेळेवर पैसे मिळेल याची कोणतीही खात्री नसते. अनेक संकटे येऊनही शेतकरी मात्र दरवर्षी खरीप हंगाम आला की धानाचा विचार करताना दिसतो. अलीकडे भाजीपाला, सोयबीन, तूर पिकाचे क्षेत्र वाढत असले तरी शेतकऱ्यांचा कल मात्र परंपरागत धानपिकाकडे दिसून येतो. कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यात दोन लाख २७ हजार ९१ हेक्टरवर पिकांची लागवड होणार आहे. त्यात भातपिकाचे क्षेत्र दोन लाख १३ हजार ८३७ हेक्टर, तूर ११ हजार ८५४ हेक्टर, सोयाबीन ६०० हेक्टर आणि कापूस ८०० हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. शेतकरी सध्या मशागतीच्या कामात व्यस्त असून, नर्सरी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. 

धानपिकालाच शेतकऱ्यांची पसंती- मुबलक पाऊस आणि सिंचनाची सुविधा असल्याने परंपरागत धानपिकालाच जिल्ह्यातील शेतकरी पसंती देताना दिसत आहेत. वर्षानुवर्ष धानाची शेती केली जात आहे. त्यामुळे नवीन पीकपद्धतीत फायदा होईल की नाही याची खात्री नसते. धानाबाबत खात्री असल्याने शेतकरी काहीही झाले तरी धान पिकवतो. नगदी पिकापेक्षा धानपीकच शेतकऱ्यांना महत्त्वाचे ठरते. प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज- जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पन्न घेतले जाते. तांदूळ निर्मिती हा प्रमुख घटक असला तरी धानापासून इतरही खाद्यपदार्थ तयार करता येतात. त्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. जिल्ह्यात केवळ राइस मिल असून, तेथे धानापासून तांदूळ तयार केले जातात. परंतु पोहे, मुरमुरे व इतर खाद्यपदार्थ तयार करण्याचे उद्योग येथे सुरू झाल्यास शेतकऱ्यांना धानशेतीतून दोन पैसे उरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती