शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

२६० कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 05:01 IST

कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अवघे २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे४२६ कोटींचे उद्दिष्ट : सर्वाधिक पीक कर्जवाटप जिल्हा बँकेत, कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा

देवानंद नंदेश्वर।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकरी कर्जमाफीमुळे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट वाढलेल्या भंडारा जिल्ह्यात कर्ज वाटपाचा टक्का अद्यापही ६१ टक्क्यांवरच असून आतापर्यंत २६० कोटी ५६ लाखांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले. त्यातही सर्वाधिक पीक कर्ज वाटप जिल्हा बँकेने २१३ कोटी रुपये केले आहे. यंदाही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना नकारघंटाच देत आहेत.कोरोना लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांजवळ पैसाच नव्हता. मात्र पीक कर्जाने या शेतकऱ्यांना तारले आहे. अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्याला यंदा ४२६ कोटी २५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अवघे २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. २३ जून पर्यंत ५२ हजार ५९८ शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्ज वाटपाची अंतिम मुदत असली तरी रेग्यूलर पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ३१ ऑगस्ट पर्यंत कर्ज भरण्याची मुदत देण्यात आली. त्यामुळे खरीपात जिल्ह्यात प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने पीक कर्ज घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० जूनपर्यंत अधिकाअधिक कर्ज वाटप करण्याचे आवाहन बँकांसमोर उभे ठाकले आहे. भंडारा जिल्ह्यात पीक कर्जासाठी प्राप्त असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ५० हजारांच्या वर असते. मात्र शेतकरी कर्जमाफीमुळे यंदा पीक कर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे या नव्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करणे आवश्यक आहे.जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर आणि ग्रामस्तरावर पीक कर्ज वाटपाचे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात आले असले तरी नव्याने कर्ज घेणाºया शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. त्यातच बँकांना मुद्रांक शुल्क ई चलनाद्वारे घेण्याचे निर्देश दिलेले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत बहुसंख्य शेतकऱ्यांना पीक कर्ज कितपत मिळेल असा प्रश्न आहे. वर्तमान स्थितीत एकुण उद्दिष्टांच्या ५२ हजार ५९८ शेतकऱ्यांना अर्थात २६० कोटी ५६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत जून अखेरपर्यंत आणखी किती शेतकºयांना पीक कर्ज मिळेल हा प्रश्न आहे.नाहरकत प्रमाणपत्रासाठी शेतकऱ्यांची भटकंतीसततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविण्यासाठी बँकांसह सावकारांकडे धाव घ्यावी लागत आहे. बँकातून कर्ज मिळण्यासाठी कागदपत्रांची किचकट प्रक्रिया असल्याने बँकांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. अलिकडे बँकांमध्ये नाहरकत प्रमाणपत्रांसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येते. मात्र कोरोनाच्या नावाखाली अधिकारीच अनुपस्थित असल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे.जिल्हा बँकेचे कर्जवाटप ८२ टक्क्यांवरजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी २६० कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत ४६ हजार ६८८ शेतकºयांना २१२ कोटी ८७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. याची टक्केवारी ८२ आहे. यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.सार्वजनिक बँकांनी केले २५ टक्के कर्ज वितरणसार्वजनिक क्षेत्रातील बँकांना १३४ कोटी २५ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ११५ शेतकऱ्यांना ३३ कोटी १४ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. त्याची टक्केवारी २५ इतकी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका माघारल्याचे दिसते.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज