२४८ शाळांवर होणार कारवाई

By Admin | Updated: May 23, 2014 23:40 IST2014-05-23T23:40:20+5:302014-05-23T23:40:20+5:30

विशेष पटपडताळणी मोहिमेत राज्यातील २४८ शाळांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील केवळ एका शाळेचा समावेश आहे. राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विद्यार्थी

248 Action to be taken on schools | २४८ शाळांवर होणार कारवाई

२४८ शाळांवर होणार कारवाई

विशेष पट पडताळणी : जिल्ह्यातील एका शाळेचा समावेश

मोहाडी : विशेष पटपडताळणी मोहिमेत राज्यातील २४८ शाळांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील केवळ एका शाळेचा समावेश आहे. राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विद्यार्थी उपस्थितीबाबत विशेष पटपडताळणी मोहिम राबविण्यात आली होती. या संदर्भात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदीचे पालन न करणार्‍या शाळा विरूद्ध कारवाई व्हावी, यासाठी उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. विशेष पटपडताळणी मोहिमेला निदर्शनास आलेल्या ज्या शाळांनी प्रत्यक्षातील विद्यार्थ्यापेक्षा जास्त पटसंख्या दर्शवून शासनाच्या विविध योजना, अनुदान अनुज्ञेय नसताना त्याचा फायदा घेतला. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ मधील शाळा मान्यतेच्या निकषांची पूर्तताही करण्यात आली नाही. अशा २४८ शाळांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. यात भंडारा जिल्ह्यातील लॉर्ड लेडी कॉन्व्हेंट स्कूल तुमसर या शाळेवर कारवाई करण्यात येणार आहे. नजीकच्या गोंदिया जिल्ह्यातील एकाही शाळेचा समावेश नाही. नागपूर जिल्ह्यातील २०, चंद्रपूर ५, गडचिरोली २, वर्धा १, अकोला ४, वाशिम ८ आदी शाळांचा संबंधित व्यवस्थापन व शाळा यांचेवर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 248 Action to be taken on schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.