शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी २३६ बसेस 'बुक'

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

१५ आॅक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहे. १४ व १५ आॅक्टोंबरला या बसेस पोलींग पाट्री पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने

सहा विधानसभेतील निवडणूक : प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा रापमचा प्रयत्नभंडारा : १५ आॅक्टोंबरला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भंडारा एसटी विभागाच्या २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहे. १४ व १५ आॅक्टोंबरला या बसेस पोलींग पाट्री पोहचविण्यासाठी निवडणूक विभागाने आरक्षित केल्या आहेत. दोन दिवस बसेस बुक असल्याने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रापमचा प्रयत्न आहे.विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक १५ आॅक्टोंबरला राज्यात एकाच दिवशी घेण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने पोलींग पाट्रीला मतदान केंद्रापर्यंत पोहचविता याव्या, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तथा खासगी गाड्यांची व्यवस्था केली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सहा विधानसभा निवडणुकीसाठी भंडारा विभागातील २३६ बसेस आरक्षित केल्या आहेत.भंडारा जिल्ह्यातील भंडारा, साकोली व तुमसर तर गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व तिरोडा विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह पोहचविण्याची जबाबदारी असल्याने बसेस आरक्षित केल्या आहेत. या बसेस १४ व १५ आॅक्टोंबरला निवडणुकीच्या कामात राहणार आहे. भंडारा विधानसभेसाठी ४४ बसेसची मागणी करण्यात आली आहे. यासाठी भंडारा आगारातुन २७ व पवनी आगारातुन १७ बसेस पाठविण्यात येणार आहे. साकोली आगाराला ६६ बसेसची मागणी करण्यात आली आहे. यातील ३७ बसेस साकोली विधानसभेसाठी तर २९ बसेस मोरगाव अर्जंनीसाठी लागणार आहेत. आमगाव व गोंदिया विधानसभेसाठी ६३ बसेसची मागणी करण्यात आली असून या बसेस गोंदिया आगार पुरवठा करणार आहे. त्यातील ३० बसेस आमगाव विधानसभेसाठी तर ३३ गोंदियासाठी मागणी करण्यात आली आहे. तिरोडा आगार तिरोडा विधानसभेसाठी लागणाऱ्या ३० बसेसचा पुरवठा करणार आहे.तुमसर विधानसभेतील पोलींग पाट्री पोहचविण्यासाठी लागणाऱ्या ३३ बसेस तुमसर आगार पुरवठा करणार आहे. भंडारा विभागात ४०६ बसेस उपलब्ध आहेत. त्यातील ३७२ बसेस नियमीत रस्त्यावर धावत आहेत. तर उर्वरीत बसेसची आवश्यकता नसल्याने त्या उभ्या आहेत. निवडणुकीसाठी २३६ बसेसची मागणी करण्यात आल्याने दोन दिवस प्रवाशांची तारांबळ उडू नये, यासाठी रापम उभ्या व सध्या कामात नसलेल्या बसेसच्या माध्यमातुन प्रवासी वाहतुक करणार आहे. (शहर प्रतिनिधी)