जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू, १,३७२ व्यक्ती पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:19+5:302021-04-25T04:35:19+5:30
जिल्ह्यात शनिवारी २३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील ११, मोहाडी ५, साकोली ३, लाखनी २ आणि पवनी ...

जिल्ह्यात २३ जणांचा मृत्यू, १,३७२ व्यक्ती पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात शनिवारी २३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यातील ११, मोहाडी ५, साकोली ३, लाखनी २ आणि पवनी व लाखांदूर तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ४ हजार ९०६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यातील ६७१, मोहाडी ६६, तुमसर १११, पवनी १६२, लाखनी २०६, साकोली ११६ आणि लाखांदूर तालुक्यात ४० असे १,३७२ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. १,४६५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून आतापर्यंत ३१ हजार ९४८ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील १३ हजार ३०३, मोहाडी तालुक्यातील २,७५६, तुमसर ४,०८९, पवनी ३,८३६, लाखनी ३,३८८, साकोली ३,०२०, लाखांदूर १,५५६ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६९५ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यात भंडारा तालुक्यातील ३४१, मोहाडी ६२, तुमसर ८५, पवनी ७४, लाखनी ४७, साकोली ५५, लाखांदूर ३१ व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना मुक्तीसाठी विविध उपक्रम राबविले जात असून लसीकरण सुरु आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचाराची सुविधा आहे. मात्र गत काही दिवसांपासून सर्व रुग्णालय हाऊस फुल्ल झाली असून खाट मिळणे कठीण झाले आहेत. तर दुसरीकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा ही तुटवडा जाणवत आहे. आरोग्य यंत्रणा प्रचंड तणावात आहे.