शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
5
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
6
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
7
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
8
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
9
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
10
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
11
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
12
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
13
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
14
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
15
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
16
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
17
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
18
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
19
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
20
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?

२१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत ; १० कोटी ४७ लाखांच्या निधीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 15:30 IST

ज्ञानार्जनावर परिणाम : ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांमधून नाराजीचा सूर !

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ५० पेक्षा अधिक शाळांमधील २१९ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे या वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या असून, त्यात विद्यार्थ्यांना बसविण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या कारणामुळे वर्गखोल्या कमी झाल्याने ज्ञानार्जनावर परिणाम होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी व त्यांच्या पालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्ह्यातील सातही तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या ७९४ शाळांमधून हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळांना दर्जेदार इमारती मिळाव्यात, वर्गखोल्यांची स्थिती उत्तम असायला हवी, अशी अपेक्षा पालकांमधून व्यक्त होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.

दरम्यान, सद्यस्थितीत २१९ वर्गखोल्यांची दुरुस्ती प्रलंबित असून, संबंधित सर्व वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीकडे दुरुस्तीसाठी १० कोटी ४७लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, निधी उपलब्ध झाल्यानंतरच हा प्रश्न निकाली काढला जाईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

दुरुस्त नसलेल्या शाळांत शिकतात हजारो विद्यार्थी

  • दुरुस्तीअभावी वर्गखोल्या निर्लेखित करण्यात आलेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सोयीसाठी वर्गखोल्यांची दुरूस्ती करणे आवश्यक ठरत आहे.
  • जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने १५२ शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. अद्यापही यातील काही कामे रखडली आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे.

या वर्गखोल्यांची दुरुस्ती कधी होणारतालुका               दुरुस्तीच्या प्रतीक्षेतीलभंडारा                       ४१मोहाडी                      ३०तुमसर                       ५४साकोली                     १३लाखनी                      १८लाखांदूर                    ३७पवनी                        २६एकूण                       २१९

१५२ वर्गखोल्यांसाठी ७ कोटींची तरतूदसन २०२४-२५ मध्ये एकूण १५२ वर्गखोल्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ७ कोटी ६३ लाखांची तरतूद करण्यात आली. यातील अनेक वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण तर, काही वर्गखोल्यांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. ज्यांचे बांधकाम रखडले आहे, त्यांनी येत्या मार्च महिन्यापर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरही पुन्हा जिल्ह्यातील २१९ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठी निधीची मागणी वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात आलेले आहेत.

७९४ शाळा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आहेतजिल्ह्यातील २१९ वर्गखोल्यांची दैनावस्था झाली असून, 'डीपीसी'कडे मागणी केली असली तरी निधी मिळण्यास विलंब होत असल्याने हा प्रश्न कायम आहे.

"जिल्ह्यातील सुमारे ५० शाळांमधील २१९ वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. दुरुस्तीसाठी निधी मिळण्यासंबंधी जिल्हा नियोजन समितीकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. निधी उपलब्ध होताच दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील."- रविंद्र सोनटक्के, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, भंडारा

टॅग्स :bhandara-acभंडाराEducationशिक्षण