शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

जिल्हा बँकेकडून २१० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप

By admin | Updated: June 16, 2016 00:46 IST

शेती कसायला पिककर्जाची गरज असताना खासगी कर्जाने शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ओढले.

५० हजार शेतकरी लाभधारक : बँकेचे जिल्हाभरात पीककर्ज मेळावेभंडारा / पालांदूर : शेती कसायला पिककर्जाची गरज असताना खासगी कर्जाने शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ओढले. बँका पिककर्ज देण्याकरिता सकारात्मकता दाखवत नसताना जिल्हा सहकारी बँकेने पीक कर्ज वाटप करीत राज्यात अव्वल ठरली आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत २१० कोटी रूपयांचे ४६ हजार ९७६ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. या जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे हे यशस्वी धुरा सांभाळत आहेत. भंडारा जिल्ह्यातील ४६ शाखांमधून ३६८ सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप प्रक्रिया सुरु आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हिताकरिता प्राथमिकता देत शिखर बँक, नाबार्ड शासन यांनी आखून दिलेले निर्देश समोर ठेऊन उद्दिष्ठ गाठत आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांना शासनाने ४९५ कोटी वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यात ४१ टक्के जिल्हा सहकारी बँक ५९ टक्के इतर बँकांना पीक कर्ज वाटपाचे कर्तव्य सादर केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी सातही तालुक्यात पीककर्ज मेळावे घेत पीककर्जाची व्यापकता वाढविली आहे. जिल्ह्यात २५-३० इतर बँका असून त्यांचे कर्जवाटप केवळ ३० कोटींच्या घरात आहे. १२ एप्रिलपासून पिककर्ज वाटप प्रक्रियेला आरंभ झाला असून संपूर्ण पिककर्ज संगणकीकृत प्रक्रियेतून थेट खात्यातून वाटप सुरु आहे. अत्याधुनिक पद्धतीने जिल्हा बँक सज्ज झाली असून तांत्रिक सेवा अविरत सुरु आहे. आमचाही शेतकरी एटीएमधारक झाला असून कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकतो. यामुळे वेळेची बचत होवून शेतकरी हायटेक झाला आहे. याकरिता जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ जिल्ह्यातील शाखांवर नियंत्रण ठेवून आहेत.पिककर्ज वाटपात ओलीताला १६५०० तर कोरडवाहूला १३५०० रुपयाचे प्रमाण निश्चित केले आहे. महागाईच्या वाढत्या चक्रानुसार दरवर्षी शासन कर्जवाटपाचे दर निश्चित करून देते. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरु असून आॅगस्टच्या शेवटचा शुक्रवारपर्यंत सुरु राहील. पिककर्ज वाटप स्वनिधीतूनच सुरु असून शिखर बँकेला १३५ कोटी पिककर्ज वाटपाकरिता मागणी केली आहे. जिल्हाधिकरी यांनी २७० कोटींचे जिल्हा सहकारी बँकेला दिलेले उद्दिष्ट्य निश्चित पूर्ण होईल. (शहर प्रतिनिधी / वार्ताहर)