२० टक्के पाणी शेतीला तारणार का?
By Admin | Updated: August 23, 2015 00:54 IST2015-08-23T00:54:47+5:302015-08-23T00:54:47+5:30
सिहोरा परिसरात चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला असला तरी, जलाशयात २० टक्के पाणी असल्याने १२ हजार हेक्टर आर शेतीला तारणार काय, ...

२० टक्के पाणी शेतीला तारणार का?
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आला असला तरी, जलाशयात २० टक्के पाणी असल्याने १२ हजार हेक्टर आर शेतीला तारणार काय, असा सवाल सुद्द शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सिहोरा परिसरात अल्प पावसाचे प्रमाण असल्याने अनेक हेक्टर आर शेतीत धानाची रोवणी करता आली नाही. टेलवर धानाची नर्सरी पुर्णत: पाया अभावी नेस्तनाबूत झाली आहे. धानाची नर्सरी जळाल्याने शेतकऱ्यांनी उसनवारीचा पर्याय निवडला आहे. डिकला तर पिकला या आशेने धानाची रोवणी करण्याचा प्रयत्न केला आहे. टेलवर पाणी नसल्याने धानाची रोवणी करता आली नाही. याशिवाय ज्या शेतीत धानाची रोवणी करण्यात आली, अशा शेतीत पाणीच नसल्याने रोवणी अडचणीत आली आहे. यामुळे चांदपुर जलाशयाचे सिंचनासाठी पाणी वाटप करण्याची ओरड गावात सुरू झाली आहे. या संदर्भात पाठबंधारे विभागाच्या रनेरा स्थित विश्रामगृहात आ. चरण वाघमारे यांचे प्रतिनिधी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश पटले यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली. या सभेत गावातील सरपंच यांना बोलाविण्यात आले. विशेषत: आजवर शेतकऱ्यांना या बैठकीत सहभागी करण्यात येत होते. परंतु यंदा पाणी वाटपाच्या बैठकीत मात्र चित्र उलटे झाले. दरम्यान चांदपुर जलाशयात २० टक्के पाणी आहे. या जलाशयाला सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने तारले आहे. सध्या स्थित ३ पंपगृह सुरू असून नदी पात्रात अल्प पाणी आहे. प्रकल्पाचे पंपगृह पाणी अभावी कधीही बंद करण्यात येवू शकतात. यामुळे रोवणी झालेल्या धान पिकाला जिवंत ठेवताना कसरत आणि जिकरीचे ठरणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
नहर आणि पादचाऱ्या केर कचऱ्यांनी तुंबल्या आहेत. यामुळे पाणी वाटपात नहरांना भगदाड पडणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. पाणी वाटपात कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता तथा शाखा अभियंता हे ठुंकूनही पाहत नाही. यामुळे अमिन यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागतो. अमिन यांची यामुळे धाकधुकी वाढली आहे. असा अनेक समस्या निर्माण असून, नहरांचे सिमेंट अस्तरीकरण निकृष्ठ, मुरूम ऐवजी माती, विकासात भ्रष्टाचार यामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी मिळत नाही, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य प्रेरणा तुरकर, धनेंद्र तुरकर, प्रतिक्षा कटरे, पंचायत समिती सदस्य सुप्रिया रहांगडाले, विमल कानतोडे, अरिंवद राऊत, राजेंद्र ढबाले, हिरालाल नागपुरे, बंटी बानेवार, गजानन निनावे, बालु तुरकर, उमेश कटरे, उमेश तुरकर, अंबादास कानतोडे, प्रभारी शाखा अभियंता तथा अन्य सरपंच व कर्मचारी उपस्थित होते. (वार्तााहर)