शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी धरणातून २० क्युबिक सोडले पाणी

By admin | Updated: September 7, 2016 00:39 IST

आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र तथा मध्य प्रदेश शासनाने सिंचनाकरिता सोडले पाणी : शेतीला पडल्या भेगा, शेतकरी डिझेल पंपाद्वारे करीत आहेत उपसामोहन भोयर तुमसर आंतरराज्यीय बावनथडी प्रकल्पातून महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाने धान पिकाकरिता पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सध्या प्रकल्पात केवळ २८ टक्के पाणी साठा शिल्लक आहे.महाराष्ट्र तथा मध्यप्रदेश शासनाचा संयुक्त बावनथडी (राजीव सागर) प्रकल्प आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर व मोहाडी तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. धानपिकाला पाण्याची सध्या गरज आहे. शेतात भेगा पडणे सुरु झाले आाहे. धान पिक वाचविण्याकरिता राज्य शासनाने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. तिच स्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. मध्यप्रदेश शासनाने एकाचवेळी दि. २३ आॅगस्ट पासून प्रकल्पातून पाणी सोडणे सुरु केले.तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुमारे आठ हजार हेक्टर शेतीला याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होईल असे जलसंपदा विभागाचे अभियंता यांनी लोकमतला सांगितले.१५ आॅगस्टपर्यंत धरणात ३५ टक्के जलसाठा होता. तांत्रिक भाषेत हा मृत जलसाठा समजला जातो. आतापर्यंत २० घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत पाणी येथे सोडण्यात येणार आहे.खापा (तुमसर) परिसरातून बावनथडीचा मोठा कालवा जातो, परंतु लहान वितरिकेची कामे अपूर्ण असल्याने सुमारे ४०० एकर शेती सिंचनापासून वंचित आा६े. कालव्यात डिझेल पंप लावून येथील शेतकरी धानपिकांना पाणी देत आहे. याकरिता शेतकऱ्यांना डिझेलकरिता हजारो रुपये खर्च करावे लागत आहे.येथील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीजवळून कालवा वाहते. परंतु आम्हाला पाणी मिळत नाही अशी खंत शेकडो शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विहिर राहून तहानलेले अशी स्थिती येथे आहे. बावनथडी धरणातून सिंचनाकरिता पाणी सोडण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातील सुमारे ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला पाणी मिळेल.- आय. बी. राठोड, उपविभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, भंडारा