शहरं
Join us  
Trending Stories
1
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
2
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
3
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
4
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
5
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
6
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
7
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
8
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
9
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
10
Reservation: आरक्षण मर्यादा ओलांडू नका; अन्यथा निवडणुका स्थगित करणार, न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला इशारा
11
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
12
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
13
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
14
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
15
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
16
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
18
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
19
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
20
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर एक लिंक देण्यात आली. त्यावर मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. कस्टमर केअरने दिलेल्या नंबरवर माहिती पाठविताच काही वेळात वसंतच्या बचत खात्यातून ९४ हजार ४९७ रुपये वळते झाले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत असली तरी थोड्या लालसेपायी अनेक जण आजही भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. जिल्ह्यातील हरदोली आणि पवनी येथील दोघांना २ लाख ४४ हजारांचा ऑनलाईन गंडा घालण्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.  तुमसर तालुक्यातील कर्कापूर येथील वसंत आनंदराव पडोळे याने आपला मित्र अशोक शामराव सारंगपुरे रा. हरदोली याच्याकडून ४ हजार ८०० रुपये घेतले होते. ते पेटीएम ॲपद्वारे परत करीत होता. त्यावेळी पैसे मित्राच्या अकाउंटमध्ये जमा न होता ते पेटीएमच्या वाॅलेटवर जमा झाले. त्यामुळे वसंतने पेटीएमच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. त्यावेळी त्याच्या मोबाईलवर एक लिंक देण्यात आली. त्यावर मोबाईल नंबर पाठविण्यास सांगितले. कस्टमर केअरने दिलेल्या नंबरवर माहिती पाठविताच काही वेळात वसंतच्या बचत खात्यातून ९४ हजार ४९७ रुपये वळते झाले. याबाबत त्याने पुन्हा कस्टमर केअरशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सिहोरा ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरी घटना पवनी येथील सोमवारी वाॅर्डात घडली. निधी शंकर भोगे (२०) असे फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या मोबाईलवर ऑनलाईन शाॅपिंग साईडमध्ये कमीशन देण्याचे आमिष एका भामट्याने दिले. त्याच्या या आमिषाला बळी पडत तिने व्हॉट्सॲप  ऑनलाईन शाॅपिंग सुरु केले; मात्र तिची १ लाख ५० हजार रुपयाने फसवणूक केल्याचे पुढे आले. अखेर पवनी ठाण्यात गुन्हा नोंदविला.

आमिषाला बळी पडू नका- अलीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. विविध ॲपद्वारे आणि लिंकच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. जिल्ह्यात यापूर्वीही अनेक घटना घडल्या. मात्र त्यानंतरही भामटे नवनवीन क्लुप्त्या करुन अनेकांना जाळ्यात ओढत आहेत. 

 

टॅग्स :Paytmपे-टीएमcyber crimeसायबर क्राइम