जिल्ह्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:31 IST2021-02-15T04:31:38+5:302021-02-15T04:31:38+5:30

भंडारा : जिल्ह्यात रविवारी ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ...

19 corona positive in the district | जिल्ह्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह

जिल्ह्यात १९ कोरोना पॉझिटिव्ह

भंडारा : जिल्ह्यात रविवारी ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, १९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार ९४० झाली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार ३७४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७५ टक्के आहे.

रविवारी २९२ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासण्यात आले, त्यापैकी १९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत १ लाख २३ हजार २४४ व्यक्तींच्या घशातील स्रावाची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात रविवारी भंडारा तालुक्यात १२, मोहाडी १, तुमसर २, लाखनी ३ व साकोली तालुक्यात एका व्यक्तीचा समावेश आहे. क्रियाशील रुग्णांची संख्या १०८ आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्यूदर ०२.४३ टक्के एवढा आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रीस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: 19 corona positive in the district