भंडारा जिल्ह्यात १८९ पॉझिटिव्ह; एकूण २६०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:10 IST2020-09-11T21:09:55+5:302020-09-11T21:10:14+5:30

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी 189 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 37 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले.

189 positive in Bhandara district; Total 2602 | भंडारा जिल्ह्यात १८९ पॉझिटिव्ह; एकूण २६०२

भंडारा जिल्ह्यात १८९ पॉझिटिव्ह; एकूण २६०२

ठळक मुद्दे०२ मृत्यू, एकूण मृत्यू 47


लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात शुक्रवारी विक्रमी 189 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 37 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1247 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2604 झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 99, साकोली 19, लाखांदूर 06, तुमसर 11, मोहाडी 18, पवनी 23 व लाखनी तालुक्यातील 13 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 1247 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 2604 झाली असून 1310 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 47 झाली आहे.
11 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 215 व्यक्ती भरती असून 1489 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 17196 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 1930 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 15266 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Web Title: 189 positive in Bhandara district; Total 2602