१८५ पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांना दिलासा
By Admin | Updated: May 22, 2015 00:59 IST2015-05-22T00:59:52+5:302015-05-22T00:59:52+5:30
सूर्य आग ओकू लागला असून पारा ४६ अंशावर पोहोचला आहे. परिणामी उकाडा असह्य होत आहे.

१८५ पाणवठ्यांमुळे वन्यप्राण्यांना दिलासा
देवानंद नंदेश्वर भंडारा
सूर्य आग ओकू लागला असून पारा ४६ अंशावर पोहोचला आहे. परिणामी उकाडा असह्य होत आहे. जंगलात वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याच्या शोधासाठी वन्यप्राणी जंगलाबाहेर जावू नये, यासाठी नैसर्गिक पानवठ्यांसह कृत्रिम पाणवठे तयार करुन वन्यप्राण्यांना दिलासा देण्याचा वनविभागाने प्रयत्न केला आहे.
भंडारा वनविभागाच्या कार्यक्षेत्रात भंडारा, लाखनी, पवनी, लाखांदूर, साकोली, मोहाडी व तुमसर हे सात तालुके आहेत. भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात विभाजन करण्यात आले आहे. भंडारा, अड्याळ, पवनी, साकोली, तुमसर, जांब, लेंडेझरी, नाकाडोंगरी आणि लाखांदूर या वनक्षेत्राचा समावेश आहे. या विभागात ३८ परिमंडळ असून नियत क्षेत्रांची संख्या १५६ एवढी आहे.
भंडारा वनविभागाचे १० वनपरिक्षेत्रात एकूण १८५ पाणवठे असून यात नैसर्गिक १२९ तर कृत्रिम ५६ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. सध्यस्थितीत वन्यप्रांण्याना कृत्रिम पाणवठ्यांनी जीवनदान मिळत आहे. वनपरिक्षेत्रात हातपंप, सिमेंट बंधारे, वनतलाव मालगुजारी तलावांद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. आता पारा ४६.५ अंश सेल्सिअसवर आहे. मे महिन्यातील परिस्थिती लक्षात घेता वनअधिकाऱ्यांनी नैसर्गिक पाणवठ्याांना पर्याय म्हणून कृत्रिम पाणवठ्यांकडे लक्ष वेधले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या घटना घडत असे. परंतु यावर्षी कृत्रिम पाणवठ्यांवर काही प्रमाणात पाणी असल्याने वन्यप्राणी आपली सीमा सोडून बाहेर पडण्याची शक्यता धुसर झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्याने उन्हाळ्यातही हिरवळ दिसत आहे. त्यामुळे जंगलात असलेली हिरवळ ही वन्यप्राण्यांच्या आहारासाठी ते पोषक मानले जात आहे.
जिल्ह्यात १,२०३ चौकिमी वनक्षेत्र