शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १७ लाचखोर अडकले जाळ्यात

By admin | Updated: September 17, 2014 23:34 IST

भ्रष्ट्राचार थांबवा देश वाचवा, ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ‘पंच लाईन’ असले तरी लाच घेणाऱ्यांची व देणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात मागील दहा महिन्यात १७ लाचखोर

भंडारा : भ्रष्ट्राचार थांबवा देश वाचवा, ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ‘पंच लाईन’ असले तरी लाच घेणाऱ्यांची व देणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात मागील दहा महिन्यात १७ लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांनी दिली. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी या कार्यालयातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी जाधव म्हणाले, वर्षभरात नागपूर कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये वर्षभरात एकूण १०५ लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यातील सर्वाधिक संख्या शासकीय कर्मचाऱ्यांची आहे. लाच घेण्यामध्ये विभागांतर्गत महसूल (२० प्रकरणे), पोलीस (१५ प्रकरणे), विद्युत विभाग (१० प्रकरणे), पंचायत समिती (८), शिक्षण (६), जिल्हा परिषद (५), भूमिअभिलेख विभाग (७) तर उपप्रादेशिक परिवहन विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.भंडारा जिल्ह्यात सन २०१३ मध्ये ११ जणांना लाच घेताना पकडण्यात आले तर २०१४ मध्ये १७ जणांना पकडण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यात सन २००३ पासून ते आतापर्यंत ६७ प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. लाच घेणे व देणे हा गुन्हा असून भ्रष्ट्राचारावर अंकुश लावण्याबाबत महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. यासंदर्भात प्रत्येक शासकीय, निमशासकीय तसेच सार्वजनिक स्थळी घोषवाक्य, पाम्प्लेट तथा ठिकठिकाणी सिडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. पत्रकार परिषदेला भंडारा ऐसीबीचे उपअधीक्षक प्रशांत कोलवाडकर, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)