खाद्यान्याचे १६ नमूने प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 22:54 IST2018-11-06T22:53:37+5:302018-11-06T22:54:02+5:30
अन्न व औषध प्रशासनातर्फे भरारी पथकाने कारवाई दरम्यान विविध खाद्यांन्य प्रतिष्ठानांवर धडक कारवाई केली. यात १६ प्रकारच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून एका पेढीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा व गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली.

खाद्यान्याचे १६ नमूने प्रयोगशाळेत
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अन्न व औषध प्रशासनातर्फे भरारी पथकाने कारवाई दरम्यान विविध खाद्यांन्य प्रतिष्ठानांवर धडक कारवाई केली. यात १६ प्रकारच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेवून एका पेढीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई भंडारा व गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली.
भंडारा कार्यालयांतर्गत अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६ व नियमन २०११ अंतर्गत दिवाळी सणाच्या पर्वावर भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूध्द चौकशी करण्यात येत असते.
यांच अंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात आली. नियमांतर्गत भंडारा कार्यक्षेत्रातील पेढ्यांची तपासणी करण्यात आली. यात खाद्यतेल, मिढाई, दुध, बेसन, रवा, मैदा वनस्पती घी, खोवा आदी अन्नपदार्थांचे १६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. यात एका तपासणीत खाद्यान्य पदार्थ दोषी आढळल्याने एका पेढीकडून पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
गोंदिया जिल्ह्यात भंडारा विभागाच्या पथकाने धाड घालून एका खाजगी कंपनीच्या दुधाच्या पॉकीटमध्ये प्लॉस्टीकचा चुरा आढळून आल्याने घटनास्थळीच साहित्य नष्ट करण्यात आले.
याशिवाय खाद्यतेल व मिरची पावडरचा ५६ किलो साठा जप्त करण्यात आला. या साहित्याची किंमत ३३ हजार ३२५ रुपये सांगण्यात येते. एका प्रकरणात खाद्य तेलाच्या खरेदी बिलामध्ये बॅच क्रमांकाचा उल्लेख नसल्यामुळे एका रिफार्इंड सोयाबिन तेल कंपनीचा साठा जप्त करण्यात आला आहे. यात ४३५ किलो तेल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ४९ हजार रुपये सांगण्यात येते. तसेच अन्य एका वनस्पतीच्या ब्रॅड निर्मित तेलाचे १५६ पाऊच संशयावरुन जप्त करण्यात आले.
सदर कारवाईमुळे ग्राहक काळजीपूर्वक खाद्यपदार्थ खरेदी करीत आहे. भेसळयुक्त खाद्य पदार्थाची विक्री करताना आढळल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झालेला आहे़ याच अंतर्गत भरारी पथक सज्ज झाले आहेत.
प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला ज्या प्रकारे फटाक्यांची व इतर साहित्याची खरेदी केली जाते़ त्याचप्रमाणे फराळाशिवाय खरेदी पूर्ण होत नाही़ बाजारात स्वीटमार्टच्या दुकानांवर यंदा दिवाळीसाठी निरनिराळे खाद्यपदार्थ उपलब्ध झाले आहेत़
सुकामेवा महागल्याने सामान्य ग्राहक मिठाई, बत्तासे रेडिमेड लाडू, चकल्यांना ग्राहकांची विशेष मागणी आहे.
शंकरपाळे, लाडू, चकल्या, करंजी, अनारसे यासारखे पदार्थ प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात दाखल झाले ओहत़ विविध प्रकारातील मिठाईची व्यक्तिपरत्वे मागणी बदलत असून, त्यांच्या किमतीही त्याप्रमाणे कमी अधिक आहेत़ उपरोक्त कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे नागपूरचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनात भंडारा येथील सहायक आयुक्त ना.रा. सरकटे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी बी. जी. नंदनवार, एस. एस. देशपांडे यांनी राबविली. या कारवाईमध्ये भेसळ करणा-यांचे धाबे दणाणले आहे.