बोनसचा १४६ कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:01:20+5:30

भंडारा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३० लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर रबी हंगामात धानाची खरेदी सुरु आहे. हमी भावासोबतच शासनाने सुरुवातीला ५०० आणि नंतर २०० रुपये असा ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र शेतकºयांना आतापर्यंत हमी भावानुसारच पैसे दिले जात होते.

146 crore bonus received | बोनसचा १४६ कोटींचा निधी प्राप्त

बोनसचा १४६ कोटींचा निधी प्राप्त

ठळक मुद्देधान उत्पादकात समाधान । जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासनाने जाहीर केलेल्या धानाच्या बोनसचे १४६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सदर निधी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही रक्कम खरीप आणि रबी हंगामात खरेदी झालेल्या धानाच्या बोनसची आहे. कोरोना संकट आणि खरीपाच्या तोंडावर बोनसचे पैसे शेतकºयांना मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
भंडारा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३० लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. तर रबी हंगामात धानाची खरेदी सुरु आहे. हमी भावासोबतच शासनाने सुरुवातीला ५०० आणि नंतर २०० रुपये असा ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र शेतकºयांना आतापर्यंत हमी भावानुसारच पैसे दिले जात होते.
कोरोना संकट आणि खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी अडचणीत आले होते. ही बाब खासदार प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याशी पत्रव्यवहार केला. प्रलंबित बोनस तात्काळ देण्यासंबंधी चर्चा केली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन कडून भंडारा जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडे १७ जून रोजी खरीप हंगाम २०१९-२० चे १०३ कोटी ६५ लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. तर रबी हंगाम २०२० - २१ मध्ये खरेदी करण्यात आलेल्या धानाचा ४२ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी १८ जून रोजी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांकडे वर्ग करण्यात आला आहे. आता धान उत्पादक शेतकºयांना लवकरच बोनसची रक्कम मिळणार आहे. संकटाच्या काळात शेतकºयांना बोनसची रक्कम महत्वाची ठरणार आहे.

Web Title: 146 crore bonus received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.