१३५ शिक्षकानी केला संघटना बदल

By Admin | Updated: October 31, 2015 01:37 IST2015-10-31T01:37:50+5:302015-10-31T01:37:50+5:30

शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून अखिल भारतीय ..

135 Teachers change organization | १३५ शिक्षकानी केला संघटना बदल

१३५ शिक्षकानी केला संघटना बदल

संघटनेला खिंडार : महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघात केला प्रवेश
भंडारा : शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवून अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे योगेश कुटे, सुरेश लंजे यांच्या नेतृत्वात १३५ शिक्षकांनी प्रवेश घेतला आहे.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी (मोठी) येथील हनुमान मंदिरात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत १३५ शिक्षकांनी हा प्रवेश घेतला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद पतसंस्था अध्यक्ष विकास गायधने, गौरीशंकर वासनिक, संजय बावनकर, राधेश्याम आमकर, ई. के. सुखदेवे, राजन सवालाखे, अनिल गयगये, राकेश चिचामे, दिलीप बावनकर, प्रकाश चाचेरे, भैय्या देशमुख, किशोर डोकरीमारे उपस्थित होते.
प्रवेश घेतलेल्या शिक्षकांमध्ये तेजराम शिवणकर, ए. एच. बेग, पी. एस. बडोले, केंद्रप्रमुख सरोज भोवते, सरिता उपरीकर यांच्यासह २४ शिक्षीका व १११ शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी मार्गदर्शन करताना मुबारक सैय्यदअली म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तालुका ते राज्यस्तरावर शिक्षकांच्या मागण्यासांठी लढणारी संघटना आहे. राज्यात सुमारे ७० टक्के शिक्षक या संघाचे सदस्य आहेत. एनपीआर व बीएलओचे शाळाबाह्य कामात राज्य संघाने प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून दिला असल्याचे सय्यद यांनी सांगितले. प्रवेश घेणाऱ्या शिक्षकांचे रामधन धकाते, विठ्ठल हारगुडे, अनिरुध्द धकाते यांनी प्रवेशाचे सोपस्कार पार पाडले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 135 Teachers change organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.