१३४९ काेराेनामुक्त, ५७३ पाॅझिटिव्ह तर १५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:58 AM2021-05-05T04:58:18+5:302021-05-05T04:58:18+5:30

जिल्ह्यात मंगळवारी ३,७९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २०७, माेहाडी ३२, तुमसर ४५, पवनी २६, लाखनी ...

1349 carnivore free, 573 positive and 15 deaths | १३४९ काेराेनामुक्त, ५७३ पाॅझिटिव्ह तर १५ मृत्यू

१३४९ काेराेनामुक्त, ५७३ पाॅझिटिव्ह तर १५ मृत्यू

Next

जिल्ह्यात मंगळवारी ३,७९९ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात २०७, माेहाडी ३२, तुमसर ४५, पवनी २६, लाखनी ५७, साकाेली १७४, लाखांदूर तालुक्यातील ३२ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार १२७ जणांना काेराेनाची बाधा झाली हाेती. त्यापैकी ४३ हजार २०४ व्यक्तींनी काेराेनावर मात केली आहे.

मंगळवारी जिल्ह्यात १५ जणांचा मृत्यू झाला. त्यात भंडारा सात, माेहाडी दाेन, लाखनी दाेन, साकाेली तीन, लाखांदूर एक असा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ९०५ जणांचा काेराेनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ९,०१८ व्यक्ती ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात भंडारा तालुक्यात ३७८८, माेहाडी ४९४, तुमसर १०१६, पवनी ७२९, लाखनी १०३७, साकाेली १५३४, लाखांदूर ४२० रुग्णांचा समावेश आहे.

गत तीन दिवसांपासून काेराेनाबाधितांची संख्या कमी हाेत असल्याने प्रशासनाला माेठा दिलासा मिळाला आहे. काेराेना संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाययाेजना करीत आहे.

Web Title: 1349 carnivore free, 573 positive and 15 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.