शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आंतरराज्यीय मार्गावर १३ वीज खांब जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 21:53 IST

शहराच्या मध्यवस्तीतून मध्यप्रेदशात जाणाऱ्या कटंगी या आंतरराज्यीय मार्गावर असलेले विजेचे १३ खांब अपघाताला आमंत्रण देत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते.

ठळक मुद्देअपघाताला आमंत्रण : तुमसर ते कटंगी रस्ता वर्दळीचा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहराच्या मध्यवस्तीतून मध्यप्रेदशात जाणाऱ्या कटंगी या आंतरराज्यीय मार्गावर असलेले विजेचे १३ खांब अपघाताला आमंत्रण देत आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते.तुमसर शहरातून कटंगी हा आंतरराज्यीय मार्ग जातो. या मार्गावर जुने बसस्थानक ते रेल्वे टाऊनच्या मुख्य गेटदरम्यान १३ वीज खांब आहेत. सदर खांब मुख्य रस्त्यालगत अगदी तीन ते चार फुटावर आहे. हा आंतरराज्यीय मार्ग असल्याने वर्दळ सुरू असते. शहरातून कटंगी मार्गे मध्यप्रदेशला जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. रेल्वे प्रशासनाने त्या मार्गावर टाऊन ते जुना साईबाबा चौकातील ३०० मीटर लांबीची सुरक्षा भिंती बांधली आहे. मात्र त्यादरम्यान विजेचा पुरवठा करणारे १३ खांब चक्क मुख्य मार्गावर आले आहेत. या मार्गाने मॉईल प्रशासनाची जड वाहतूक, खाजगी वाहतूक अहोरात्र सुरू असते. या मार्गावरील डाव्या बाजूने होणारी वाहतूक या खांबामुळे असुरक्षित झाली आहे.तुमसर शहरातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्था उपजिल्हा रुग्णालय याच मार्गावर आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी हाच प्रमुख मार्ग आहे. या मार्गावर एकाचवेळी गर्दी होते. अशास्थितीत रस्त्यालगतचे खांब अपघास आमंत्रण देत आहे. विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना सुरक्षा भिंतीमुळे अनेकदा दिसत नाही. रात्रीच्यावेळी वाहतूकदारांची त्रेधा उडते.वीज वितरणचे दुर्लक्षवीज वितरण कंपनीकडे या खांबाबाबत वारंवार सुचना देवूनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. आतापर्यंत अनेकदा लहान अपघात झाले आहेत. वीज वितरण कंपनी मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहेत काय, असा सवाल तुमसर येथील नागरिक करीत आहे.