भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 21:01 IST2020-06-01T20:54:29+5:302020-06-01T21:01:06+5:30
ही घटना सोमवारी मांगली- देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.

भरधाव ट्रकच्या धडकेत बारा वर्षीय मुलगी जागीच ठार
तूमसर (भंडारा) : मध्य प्रदेशमधील गोडावूनमधून तांदळाचे पोते भरलेला माल मांगली-देव्हाडी मार्गे रायपूर येथे वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रक (एचआर - ५५ पी ५८५७) या ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने बारा वर्षीय बालिका जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी मांगली- देव्हाडी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
कीर्ती राजेंद्र पुंडे (१२, रा.मांगली) असे ट्रकच्या धडकेत ठार झालेल्या बालिकेचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील मांगली येथील कीर्ती पुंडे ही बारा वर्षीय मूलगी सायकलने मांगली वरून खापा येथे येत असताना भरधाव मालवाहू ट्रकजवळून गेल्याने तिचा सायकलवरून तोल गेला व ती चालकाच्या बाजूच्या मागच्या चाकात दबल्या गेल्याने ती जागीच ठार झाली. ट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
परंतु येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तुमसर व देव्हाडी पोलिसांना सदर घटनेची माहिती तात्काळ दिल्याने त्या ट्रक व ट्रकचालकांना देव्हाडी पोलिसांंनी ताब्यात घेत अटक केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांनी घटनास्थळ गाटून मुलीचे शव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले पूढील तपास पोलिस उपनिरीक्षक वर्मा करीत आहेत. मृतक कीर्ती पुंडे ही बालीका तूमसर येथिल एका खाजगी प्राथमीक शाळेत पाचव्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे