आयकर पथकाची १२ तास चौकशी

By Admin | Updated: July 23, 2015 00:27 IST2015-07-23T00:27:52+5:302015-07-23T00:27:52+5:30

तुमसर शहरातील कारेमोरे प्रतिष्ठानावर आयकर विभागाने मंगळवारी दुपारी धाड घातली. या पथकाने सुमारे १२ तास कसून चौकशी केली

12 hours inquiry into income tax squad | आयकर पथकाची १२ तास चौकशी

आयकर पथकाची १२ तास चौकशी

भंडारा : तुमसर शहरातील कारेमोरे प्रतिष्ठानावर आयकर विभागाने मंगळवारी दुपारी धाड घातली. या पथकाने सुमारे १२ तास कसून चौकशी केली. सन २०१२ मध्ये आयकर संदर्भात या विभागाने कारेमोरे यांना नोटीस बजावली होती. त्याचे उत्तर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
आयकर विभागाचे पथक शहरात मंगळवारी दुपारी १२ वाजता दाखल झाले. रात्री १२ वाजतापर्यंत त्यांनी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. रात्री हे पथक नागपूरकडे निघाले. सन २०१२ मध्ये आयकर विभागाने कारेमोरे यांना आयकर संदर्भात नोटीस पाठविली होती. तीन वर्षे लोटूनही या नोटिसासंदर्भात माहिती सादर करण्यात आली नव्हती. त्यामुळे आयकर विभागाचे पथक तुमसरात दाखल होऊन तपासणी केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 12 hours inquiry into income tax squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.