शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: February 28, 2024 18:00 IST

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली ...

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली आहे. यामुळे आरोपींची संख्या १६ वर पोहचली असून या सर्वांविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल कऱण्यात आले आहे.

या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला आश्रय देण्याच्या कारणावरून विश्वनाथ बांडेबुचे व विजय पुडके या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यांच्यावर कलम २१२,२१६ अंतर्गत कारवाई करून त्यांच्याविरोधातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तुमसर येथील व्यवसायी नईम शेख २५ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी काही साथीदारांसह कारने तिरोडी येथून तुमसरकडे परत येत असताना गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव करत आहेत.

८ आरोपींवर मोक्काअंतर्गत खटला चालवण्यास मंजुरीआरोपी संतोष डहाट, सतीश डहाट, शुभम पंधरे, रवी बोरकर, गुणवंत यावकार, आशिष नेवारे, अमन मेश्राम, विशाल मानेकर या ८ आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ चे अन्वये आरोपींवर खटला चालवण्यास मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. याच गुन्ह्यातील आरोपी दिलखूश कोल्हाटकर, सचिन भोयर, आशुतोष घडले, विनेक सांडेकर, नरेंद्र पीपलधरे, सुरेंद्र पीपलधरे या सहा आरोपींची मोक्कातून मुक्तता झाली. त्यांच्यावर राज्य शासनाने मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यास मनाई केली आहे.

दोघे फरारचनईम खून प्रकरणातील सहभागी असलेल्या १४ मधील विनेक सांडेकर, विशाल मानेकर हे दोघे अद्यापही फरार आहेत. तर १२ आरोपींनी यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते भंडारा, नागपूर, चंद्रपूर या कारागृहात बंदिस्त आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी