नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: February 28, 2024 06:00 PM2024-02-28T18:00:01+5:302024-02-28T18:00:23+5:30

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली ...

1173 page charge sheet filed in Naeem Sheikh murder case | नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

नईम शेख हत्याकांडप्रकरणी ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल

भंडारा : तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या नईम शेख हत्याकांडातील १४ आरोपींमध्ये पुन्हा दोन आरोपींची भर पडली आहे. यामुळे आरोपींची संख्या १६ वर पोहचली असून या सर्वांविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात ११७३ पानांचे आरोपपत्र दाखल कऱण्यात आले आहे.

या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला आश्रय देण्याच्या कारणावरून विश्वनाथ बांडेबुचे व विजय पुडके या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. यांच्यावर कलम २१२,२१६ अंतर्गत कारवाई करून त्यांच्याविरोधातसुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

तुमसर येथील व्यवसायी नईम शेख २५ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी काही साथीदारांसह कारने तिरोडी येथून तुमसरकडे परत येत असताना गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मिता राव करत आहेत.

८ आरोपींवर मोक्काअंतर्गत खटला चालवण्यास मंजुरी
आरोपी संतोष डहाट, सतीश डहाट, शुभम पंधरे, रवी बोरकर, गुणवंत यावकार, आशिष नेवारे, अमन मेश्राम, विशाल मानेकर या ८ आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा १९९९ चे अन्वये आरोपींवर खटला चालवण्यास मुंबईचे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी मंजुरी दिली आहे. 
याच गुन्ह्यातील आरोपी दिलखूश कोल्हाटकर, सचिन भोयर, आशुतोष घडले, विनेक सांडेकर, नरेंद्र पीपलधरे, सुरेंद्र पीपलधरे या सहा आरोपींची मोक्कातून मुक्तता झाली. त्यांच्यावर राज्य शासनाने मोक्का अंतर्गत कार्यवाही करण्यास मनाई केली आहे.

दोघे फरारच
नईम खून प्रकरणातील सहभागी असलेल्या १४ मधील विनेक सांडेकर, विशाल मानेकर हे दोघे अद्यापही फरार आहेत. तर १२ आरोपींनी यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून ते भंडारा, नागपूर, चंद्रपूर या कारागृहात बंदिस्त आहेत.

Web Title: 1173 page charge sheet filed in Naeem Sheikh murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.