शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या वयाच्या ११ वर्षीय बालिकेवर वकिलाकडून अत्याचार; पोक्सोखाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:53 IST

Bhandara : खेळायला गेली होती मैत्रिणीच्या घरी, खोटे बोलून केले कुकृत्य

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या शेजारच्या ११ वर्षांच्या बालिकेशी खोटे बोलून आत बोलावले आणि लैंगिक अत्याचार केला. बालिकेने घरी जाऊन आपल्या आईला आपबीती सांगितल्यावर सोमवारी रात्री ११:१६ वाजता तक्रारीनंतर पोक्सोसह अनेक कलमांखाली अटक करण्यात आली.

विजय रेहपाडे (४८) असे या नराधम आणि विकृत वकिलाचे नाव असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय तक्रारदार महिला तिच्या १३ वर्षाच्या मुलासह आणि ११ वर्षाच्या मुलीसह भंडारा येथे राहते. त्याची मुलगी ३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आली. संध्याकाळी ७वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. यावेळी मैत्रिणीचे वडील अॅड. विजय रेहपाडे हा घरीच होता. तुझी मैत्रीण आत बेडरूममध्ये खेळत आहे, असे खोटे सांगून त्याने तिला बेडरूममध्ये पाठविले. त्यानंतर पाठोपाठ जाऊन बेडरूममधील लाइट बंद केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेने कशीबशी त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेत संध्याकाळी ७:३० च्या सुमारास रडत स्वतःचे घर गाठले. आईने रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपबिती सांगितली.

मुलीने सांगितलेला प्रकार ऐकताच आईच्या पायाखालची वाळूच घसरली. स्वतःला सावरत आणि प्रसंगावधान राखत आईने मुलीसह भंडारा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री पोलिसांनी वकिलाच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ६५ (२) (बलात्काराची शिक्षा), ७५ (लैंगिक छळ), पोक्सोच्या कलम ४, ६, ८, १२ आणि अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. 

आरोपी बार असोसिएशनचा उपाध्यक्षआरोपी वकील विजय रेहपाडे हा भंडारा जिल्हा बार असोसिएशनचा उपाध्यक्षही आहे. एवढेच नाही तर, भंडारा जिल्हा परिषदेचा अधिकृत वकीलही आहे. मागील १५ वर्षांपासून तो जिल्ह्यात आणि उच्च न्यायालयात वकिली करत असून अलीकडेच त्याची नोटरी म्हणून नियुक्तीही झाली होती.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणbhandara-acभंडाराPOCSO Actपॉक्सो कायदा