शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

भंडारा येथे अन्नातून 115 विद्यार्थ्यांना विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2018 10:30 IST

विभागीय क्रीडा स्पर्धेतील घटना; जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु

ठळक मुद्देदुपारच्या जेवणामुळे आज जवळपास १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली हे विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत

भंडारा -  आज  आदिवासी विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर देण्यात आलेल्या दुपारच्या जेवणामुळे जवळपास ११५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून हे विद्यार्थी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या विद्यार्थ्यांवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून वृत लिहिपर्यंत रुग्णालयात दाखल करणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती. शनिवारी सकाळच्या सत्रात आदिवासी विकास विभागीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर विज्ञान प्रदर्शनीची पाहणी करण्यात आली .यानंतर सर्वच खेळाडू व शिक्षकांना जेवण देण्यात आले. यात बहुतांश जणांना काही तासानंतर मळमळ वाटणे, डोकेदुखी व उलट्या होण्याचा त्रास झाला. दुपारी साडेतीन ते चार वाजतापर्यंत जेवण आटोपले. मात्र तोपर्यंत काही विद्यार्थ्यांना त्रास उद्भवल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे यात काही शिक्षकांनाही या विषबाधेचा फटका बसला. सदर विषबाधा अन्नातून व पाण्यातून झाल्याचे रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यातही पिण्यासाठी देण्यात येणारे पाणी संपल्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी दिले, असे खेळाडूंचे म्हणणे आहे. यातूनच या सर्वांची प्रकृती बिघडली. रात्री उशिरापर्यंत अस्वस्थ वाटणाºया विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणण्याचे कार्य सुरुच होते. यात १४ विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले असून उर्वरीत विद्यार्थी व शिक्षकांना प्रथमोपचार करून जिल्हा क्रीडा संकुलात विश्रांतीसाठी पाठविण्यात आले. रुग्णालयात एकात्मिक प्रकल्प अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भेट देत विद्यार्थ्यांची विचारपूस केली. यात त्यांनी खाल्लेले अन्न व पाणी यात दोष होता काय? याबाबत चौकशी केली.अपुरी व्यवस्थासदर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी दोन हजार ७०० मुलांसह ३०० शिक्षकांनी सहभाग नोंदविला आहे. पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होत असताना जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धेचे व्यवस्थापन ढासळल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांसाठी चटई, गाद्या व आरोच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेही खेळाडूंनी यावेळी सांगितले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाSchoolशाळाStudentविद्यार्थी