शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

Nail shape: तुमच्या नखांचा आकार सांगतो तुमचे भाग्य कधी उजळेल? जाणून घ्या आत्ताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 17:05 IST

नखं आपल्या बोटांच्या टोकांचे संरक्षण तर करतातच, शिवाय या नखांमध्ये आपलं भाग्यही दडलेलं असतं, असं म्हटलं जातं.

आपल्या शरीराचे अवयव आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही व्यक्त करतात. रेषा आणि हाताच्या आकाराला आणि तळहातावरच्या रेषांना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. त्यावरून भाग्य कळतं, असं म्हटलं जातं. याशिवाय हाताच्या बोटांच्या नखांनाही विशेष महत्त्व आहे. नखं आपल्या बोटांच्या टोकांचे संरक्षण तर करतातच, शिवाय या नखांमध्ये आपलं भाग्यही दडलेलं असतं, असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यक्तीच्या नखांचा आकार भिन्न असतो. कुणाची नखं चमकदार आणि लांब असतात, तर कुणाची नखं आखूड असतात. तसंच त्यांच्यावर हलक्या रेषाही असतात.

हात, बोटं, नखं यांचा पोत आणि रंगावरून एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेता येतं. त्यावरून त्या व्यक्तीचं भविष्यदेखील कळू शकतं, असं म्हटलं जातं. नखांच्या आकारावरून माणसाचा स्वभावही ओळखला जातो. तो कोणत्या क्षेत्रात नाव कमावणार किंवा आपला ठसा उमटवणार हे कळू शकतं. काही जणांची नखं बदामाच्या आकारासारखी असतात. अशी बदामाच्या आकाराची नखं असलेली माणसं खूप दयाळू असतात. सर्वांशी चांगलं वागतात. या व्यक्ती अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सदैव तत्पर असतात.

काही जणांची नखं तीक्ष्ण असतात. तीक्ष्ण नखं असलेल्या व्यक्ती खूप हट्टी आणि रागीट असतात. तीक्ष्ण नखांच्या व्यक्तींचं कुणाशीही लवकर भांडण होतं. व्यक्तीगणिक नखांचा आकार बदलतो. काही जणांच्या नखांचा आकार चौकोनी असतो. चौकोनी आकार असलेल्या व्यक्ती स्वभावाने खूप गंभीर असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता असते. त्यांच्या नेतृत्वगुणामुळे त्यांना भरपूर यश मिळतं.

काही जणांची नखं लांब आणि रुंद असतात. लांब नखं असलेल्या व्यक्ती स्वभावाने साध्या, पण खूप सर्जनशील असतात. त्यांची कल्पनाशक्तीही खूपच चांगली असते. यासोबतच त्या कलेच्या क्षेत्रात चांगलं नाव कमावतात. रुंद नखं असलेल्या व्यक्ती अत्यंत हुशार असतात. रुंद नखं असलेल्या व्यक्तींमध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता आश्चर्यकारक असते. आपल्या मेंदूचा ते अत्यंत योग्य वापर करतात आणि आपलं काम लवकर पूर्ण करतात.

अनेकांची नखं गोल किंवा अंडाकृती असतात. ज्यांची नखं गोल किंवा अंडाकृती असतात, त्या व्यक्ती कोणालाही सहजपणे प्रभावित करण्यात यशस्वी असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचं विलक्षण आकर्षण असतं. त्यामुळे ते लोकांना आपल्याकडे आकर्षून घेतात. या आधारे तुम्हीदेखील नखांच्या आकारावरून तुमचं किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींचं भाग्य जाणून घेऊ शकता.

टॅग्स :Astrologyफलज्योतिष