शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात; वाचा भगवान महावीरांनी सांगितलेली गोष्ट!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 16, 2021 9:00 AM

संतांचा सहवास आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो, हे सांगणारी छोटीशी कथा.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भगवान महावीर एका गावात आपल्या शिष्यांसह आले. लोकांना ते भक्तीमार्ग समजावून सांगत. त्यांच्या अनमोल वचनांमुळे कित्येकांनी चांगला मार्ग स्वीकारला. त्या गावात एक चोर होता. त्याला महावीरांचा उपदेश आवडत नसे. त्याच्या बरोबरीने चोरी करणारे अनेक चोर आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय सोडून महावीराच्या उपदेशाप्रमाणे आचरण करू लागले होते. त्यामुळे तो जिथे महावीर असतील तिथे थांबत नसे. 

एके दिवशी तो चोर भयंकर आजारी पडला. त्यावेळी त्याने आपल्या मुलाला बोलवून सांगितले, `हे बघ बाळ, मी आता जास्त दिवस जगेन असे वाटत नाही. माझ्यामागे तू आपला पिढ्यानपिढ्या चालत आलेला चोरीचा धंदा पुढे असाच चालू ठेव. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावात जोपर्यंत महावीर आहेत, तोपर्यंत त्यांच्याजवळ फिरकू पण नकोस. ते जिथे असतील तिथून दूर निघून जा.

थोड्याच दिवसाने चोराने शरीर सोडले. त्याचा मुलगा पुढे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चोरीचा व्यवसाय करून निष्णात चोर बनला. बरीच संपत्ती त्याने जमवली. 

एके दिवशी मात्र महावीरांच्या मठाजवळून जाताना त्याला महावीरांचे दर्शन झाले. महावीर जमलेल्या भाविकांना उपदेश करत होते. चोराच्या मुलाने वडिलांनी सांगितल्याप्रमाणे महावीरांच्या मठाजवळ न थांबता तिथून तो पळत सुटला. त्यांचा उपदेश कानावर पडू नये म्हणून कान बंद करून घेतले. तरीही अर्धे वाक्य त्याच्या कानावर पडलेच. महावीर मृत्यूनंतरच्या अवस्थेचे वर्णन करत असताना म्हणत होते की, 'शरीरातील प्राण घेऊन जाणारे यमाचे सेवक उलट्या पायाचे असतात', एवढे वाक्य मात्र ऐकले, पुढचे वाक्य ऐकू येऊ नये म्हणून त्याने कान बंद केले नि तो तिथून पळत सुटला.

एके दिवशी सावकाराच्या वाड्यावर मोठा दरोडा पडला. राजाच्या सैनिकांनी संशयीत म्हणून चोराच्या मुलाला पकडून नेले. चोरी त्यानेच केली होती. परंतु तो कबुल होईना. नाना प्रकारे त्याला कबुल करायवयास लावले, पण व्यर्थ! शेवटचा उपाय म्हणून त्याला गुंगीचे औषध देण्यात आले. सात आठ दिवस बेशुद्ध ठेवल्यावर तो अर्धवट शुद्धीवर आला. तो मरण पावला आहे, असे भासवण्यासाठी त्याच्या भोवती पाच सहा सुंदर स्त्रिया जमवल्या, त्या म्हणाल्या, `आम्ही यमराजाच्या सेविका आहोत. तुझा प्राण आम्ही घेऊन जात आहोत. तू तुझ्या जीवनात जे काही दुष्कर्म केले असेल ते खरंखरं सांगितलं तर तुला आम्ही स्वर्गात नेऊ आणि खोटं सांगितलं तर तुझी नरकात रवानगी करू.'

आपल्याकडून चोरीची कबुली करून घेण्यासाठी तर हे षडयंत्र नसेल! अशी त्याला शंका आली. तेवढ्यात त्याला महावीरांचे वाक्य आठवले. महावीर म्हणाले होते, की 'यमराजांच्या सेवकांचे पाय उलटे असतात.' परंतु यांचे पाय तर आपल्यासारखेच आहेत. म्हणजे नक्कीच आपल्याला शिक्षा करण्यासाठी हे कारस्थान आहे. हे त्याने जानले. परंतु वरकरणी काहीही न दर्शवता तो म्हणाला, `तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मलाही स्वर्गात जायची खूप इच्छा आहे. पण मी एकही दुष्कर्म केलेले नाही.'

राजाचा हा प्रयत्नही व्यर्थ ठरला. काहीही पुरावा नसल्याने राजाला त्याला सोडून द्यावे लागले. केवळ महावीरांच्या अध्र्या वाक्यामुळे त्याची शिक्षा टळली. त्याने विचार केला, की महावीरांचे अर्धे वाक्य जर आपल्याला कारावासाच्या बंधनातून मुक्त करू शकले, तर त्यांचा पूर्ण उपदेश जर ऐकला, तर जीवन खऱ्या अर्थाने मुक्त होईल. नंतर तो त्वरित महावीरांना शरण  गेला. त्याने सारी हकीगत त्यांना सांगितली आणि त्यांचा अनुग्रह घेतला व आपले जीवन सुखी केले.